पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणे नगर वाचन मंदिर, पुणे वर्ग. ५१ ८२१९० 946 गडकोट हबशियांकडे होते ते हस्तगत केले. मुलूख कवज केला. राहतां एक जंजिरा व आणखी दोन चार स्थळे राहिली आहेत. त्यांचीही तरतूद कर्तव्य ते करीजेत आहे. ऐशियास हबशाकडील सिदी मसूद सुरतेस आहे; तो जमाव करून जलमार्गे जंजिरेयाचे कुमकेस येणार ह्मणून वर्तमान विदित झालें. तरी हवशी दुष्ट त्याचें निर्मूल करावें हें स्वामींस परम आवश्यक. स्वामींचे आज्ञेप्रमाणे त्रिवर्ग सायास करणे तसा करीत आहेत. स्वामींचे पुण्य- प्रतापेंकरून योजिला मनसवा सिद्धीस पावतच आहे. जंजिरेकर हवशी या मध्यें अवसान राहिलें नाहीं. परंतु सुरतेहून सिद्दी मसूद याचा बेत जंजि- रेयाचे कुमकेस न यावें ऐसे करावे लागते. यास्तव आज्ञापत्र सादर केले असे. दुष्टाचा निःपात होऊन स्वामींचें राज्य अभिवृद्धीस पावावें हें तुझांस आवश्य कच आहे. याकरितां सुरतेचा मोंगल फौजदार व कोटचा किल्लेदार असेल त्त्यांस ताकीद करून पत्रे पाठविणे, आणि सिद्दी मसूद याची कुमक जंजिरेयास न पोंहचे ऐसे करणे. या वेळीं सिद्दी मसुदास हस्तगत करावयाचीही तरतूद करणे.” १०३ न १/४ ह्याप्रमाणे शाहु महाराजांचें पत्र गेल्यानंतर माजी गायकवाड व उमाबाई दाभाडे ह्यांनी सिद्दी मसूद ह्यास अडकवून ठेवण्याचा ताबडतोब प्रयत्न के- ल्याचें दिसत नाहीं. इकडे प्रतिनिधि अंजनवेलपर्यंत पोहोंचले व तेथें शह देऊन बसले; व बाजीराव जंजिरा दाबांत आणण्याचा अधिक अधिक प्रयत्न करूं लागले. तेव्हां अशा वेळीं सिद्दी मसूद सुरतेहून आल्यास त्यांच्या मन- सव्यास पेंच पडेल असे समजून, शाहु महाराजांनी माजी गायकवाडास ता० १२ आगष्ट रोजी पुनः पत्र पाठविलें. त्यानंतर सिद्दी मसूद जंजिन्याकडे आल्याचे दिसत नाहीं. सिद्दी मसूद ह्याचें जंजिरेकर हबशांस साहाय्य मिळाले नाहीं; परंतु इंग्रजांचें साहाय्य मिळेल की काय अशी मराठ्यांस फार भीति होती. म्हणून बाजीराव पेशवे ह्यांनीं, इंग्रजांच्या मुंबईच्या अधिका-यांकडे अत्यंत स्नेहभावदर्शक व स्तुति- पर पत्र पाठवून, त्यांस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न चालविला. एवढेच नव्हे, तर राजापुरास इंग्रजांचे वकील लोदर आणि डिकिन्सन नामक दोन गृहस्थ होते.