पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कडे संधान बांधून, जंजिन्याची गादी मिळविण्याचा प्रयत्न चालविला. पेश- व्यांस ही संधि महत्त्वाची वाटून त्यांनी त्यास हाताशीं घेतले; आणि इ० स० १७३३ च्या मे महिन्यापासून दिसेंबरपर्यंत, राजपुरीस शह देऊन, जंजिरा हस्तगत करण्याची खटपट चालविली. इ० स० १७३३ च्या वैशाख महिन्यांत, बाजीराव, प्रतिनिधि व फत्तेसिंग भोसले ह्यांनी आपले सैन्य कोंकणांत येऊन पोहोंचल्यावर, शेखजीच्या गुप्त मसलतीनें, कोंकणांतील मुख्य मुख्य स्थळे हस्तगत करण्याचा क्रम चालविला. ता० २५ मे इ० स० १७३३ रोजी मंडणगडकिल्ला घेतला व बिरवाडीपासून निजामपुरापर्यंतच्या गांवावर अंमल बसविला. पुढे प्रतिनिधींनीं माघारें उल- टून, ता० ८ जून इ० स० १७३३ रोजीं, रायगड सर केला; व महाडावर मोर्चे लावून तेंही काबीज केले. येणेंप्रमाणे उत्तर कोंकणांतील स्थळे हस्तगत करून तेथें मराठ्यांचा अंमल बसविण्याचे काम प्रतिनिधि व फत्तेसिंग भोंसले ह्यांनीं चालविलें. इकडे बाजीराव पेशवे ह्यांनी जंजियास वेढा देऊन ह बशी लोकांस जेर करण्याचा दृढ संकल्प केला; आणि खुपकीवरून मोर्चे लावून जंजिऱ्यावर तोफांचा एकसारखा भडिमार चालविला. दुसरीकडून मानाजी आंग्रे ह्यांनी पाण्यांतून मार चालविला. तथापि जंजिरा- राजपुरी ही फार बळकट जागा असल्यामुळे व हवशी लोकांचा जमाव दांडगा असल्यामुळे कांहीं दिवसपर्यंत त्यांनीं बिलकूल दाद दिली नाहीं. परंतु पुढे त्यांच्याने मराठ्यांपुढे टिकाव धरवेना. तेव्हां त्यांनी इंग्रज व सुरतेचा हवशी सरदार सिद्दी मसूद ह्यांची मदत मागून, एका बाजूने आंग्रे व एका बाजूने बाजीराव ह्यांच्या सै- न्याचा नाश करण्याचा विचार केला. सुरतेहून सिद्दी मसूद हा हवशांच्या मदतीस येत आहे असे समजतांच, ता० ७ जुलई ३० स० १७३३ रोजीं, शाहु महाराजांनी दमाजी गायकवाड व उमाबाई दाभाडे ह्यांना खास दस्तकाचें पत्र पाठवून असे कळविलें कीं, “राजपुरीकर हवशी अमर्यादेनें वर्तो लागला. कोंकणप्रांत उत्पात आरंभिला. त्यास शासन केल्याविना देवब्राह्मण स्वस्थळीं राहत नाहींत. ऐसें जाणोन स्वामींनीं चिरंजीव राजश्री फत्तेसिंग भोंसले व राजश्री श्रीनिवासपंडित प्रतिनिधि व राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांस आज्ञा करून हवशांवरी मोहिम करविली. रायगड आदिकरून कोंकणांतील