पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ रवानगी करूं. वरकड राजश्री बाळाजीपंत यांच्या लिहिल्यावरून कळेल. सारांश तीर्थरूपामार्गे आह्मांस आपण वडील. जे गोष्टीने आपले व आमचे पदरीं गुम्हाणा न ये, ते गोष्टी केली पाहिजे. जाणिजे रवाना छ २५ माहे जिल्काद. बहुत काय लिहिणे हे विनंति (मोर्तबसुद).” ह्यानंतर सेखोजी आंग्रे व वा जीराव पेशवे ह्यांची भेट झाली व उभयतांच्या संमतीनें शामलांवर चाल करून त्यांस नेस्तनाबूद करण्याचा विचार ठरला. ह्या दरम्यान स्वामींची जी चळवळ चालली होती ती फारच मौजेची होती. स्वामींनी कान्होजी आंग्रे ह्यांची पत्नी मथुराबाई हिजला पत्र पाठवून असे लिहिले की, “राजश्री बकाजी नाईक यांची रवानगी अंजनवेल गोवळको- टचे मसलतीस केली आहां. त्यास, हनमंताचा गौरव रघुनायें करून त्याचे हस्ते लंका घेतली, त्याप्रमाणे बकाजी नाईकाचा गौरव करून, लोकांस देणे देऊन, दोनी स्थळे सत्वर घेतली तर बरे वाटतें नाहींतरी हळू हळू खालीं समाधीस येऊं" (ग्रं० ले० ३०५). म्हणजे हीं दोन्हीं स्थळे स्वराज्यांत झालीं म्हणजे श्री परशुरामी जाण्याचा स्वामींचा विचार होता. परंतु प्रतिनिधींच्या चुकीमुळे तसे घहून आले नाहीं; म्हणून स्वामी कोंकणांत समाधीस गेले नाहींत. त्यांनी महाराष्ट्रांत राहूनच गोवळकोट व अंजनवेल हीं स्थळे मराठ्यांस हस्त- गत होतील असा यल आरंभिला. . मराठ्यांचें सैन्य जंजिन्यास येण्यापूर्वी तेथें राज्यक्रांतीचा प्रकार घडून आला. त्याची थोडी हकीकत सांगणे जरूर आहे. इ० स० १७३३ च्या फेब्रुवारी महिन्यांत जंजिऱ्याचे खान सिद्दी सुरूर हे मृत्यु पावले. ह्यांस आठ मुलगे होते. त्यांपैकीं वडील मुलगा सिद्दी अवदुला हा बापाच्या वेळेपासूनच राज्य- कारभार पाहात होता व तोच गादीचा खरा अधिकारी होता. त्यास, खान- साहेबांचें प्रेत दहन करण्यासाठी किल्यांतून बाहेर आणल्यानंतर, त्याच रात्रीं, सिद्दी संधूल नामक हवशानें ठार मारिलें; व सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेऊन त्याचा धाकटा भाऊ सिद्दी हसन ह्यास नांवाचा अधिकारी केलें. ही गोष्ट खानसाहेबांचा दुसरा मुलगा सिद्दी अबदुल रहिमान ह्यास समजतांच, त्याने मराठ्यांस वश झालेल्या शेख याकूब ऊर्फ शेखजी नामक इसमास आपल्या पक्षास अनुकूल करून घेतलें; व त्याच्या मार्फत बाजीराव पेशवे ह्यांज-