पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ पिलाजी जाधवराव ह्यांची शेवटीं योजना केली. परंतु त्यांच्या जाण्याचा विशेष उपयोग न होतां प्रतिनिधींस हताश होऊन परत येणे भाग पडलें. इकडे हवशांचें पारिपत्य झाले नाहीं हे पाहून ब्रह्मद्रस्वामींस फार वाईट वाटले. त्यांनी शाहु, बाजीराव, आणि आंग्रे ह्यांच्याकडे एकसारखीं संधाने लावून त्यांना हवशांची स्थळे हस्तगत करण्याबद्दल प्रोत्साहन दिले. बाजी- राव निजामउलमुलकाकडून येऊन, तसेंच तांतडीनें, ता० २६ मे इ० स० १७३३ मध्ये, राजपुरीकडे गेले. तिकडे जाण्यापूर्वी त्यांनीं सेखोजी आंग्रे ह्यास वैशाख वद्य दशमीस पाल मुक्कामी भेटीस बोलाविलें. त्या वेळीं सेखोजी आंग्रे ह्यांनी बाजीरावांस जे पत्र पाठविलें तं विशेष महत्त्वाचे आहे. ते येणेप्रमाणेः- “राजश्री बाजीराव पंडित प्रधान दाजी गोसावी यांसः- 2 सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मी-अलंकृत राजमान्य राजश्री स्नेहांकित से- खोजी आंग्रे सरखेल रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केले पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रसिद्ध होऊन लेखनार्थ अवगत जाहला. “वैशाख वद्य दशमीस स्वार होऊन पालीस येतो. आपण दशमीस पालीस यावें. आपली आमची भेटी होऊन कर्तव्य तें केले जाईल. सारांश, आह्मी जातच आहों. तुझी न याल तेव्हां चाकरीस अंतराय केलासा राजश्रीचे चित्तांत येऊन गुम्हाणा मात्र राहील. या गोष्टींत उचित नाहीं." ह्मणोन विशंदे लेख केला. ऐसियास आपण कोंकणचे मसलतेस यावें; आह्मी हरोळी करावी; देशदुर्गे हस्तगत करावीं; याजपेक्षां दुसरें अधिकोत्तर काय? परंतु येथील जंजिरियांच्या लोकांप्र॥ (?) आपण माहीतच आहेत व जमावाचा पोख्ता विचार असावा एतद्विषयींचा अर्थ आपणास कळावा. याच अर्थ राजश्री खंडो चिमणाजी यांस मुखतां सांगोन पाठविले आहे. त्याजवरून कळलेच असेल. मंगळवारी राजश्री महादाजी कृष्णव चिरंजीव मानाजी आंगरे यांची धार देऊन ते धावडशीकर स्वामीच्या दप्तरांतून मिळाल असे टीपेमध्यें लिहिले आहे व अशींच आणखी शाहूचीं व पेशव्यांच्या मुतालिकांची अस्सल पत्रे उप- लब्ध झाल्याचे लिहिले आहे. यापैकी बहुतेक पत्र आह्मांस उपलब्ध झाली. परंतु हे चिमाजीआपास लिहिलेले खरमरीत पत्र अद्यापि सांपडले नाहीं ! त्यामुळे तेवढ्यापुरता ग्रांटडफवर हवाला ठेवणे भाग आहे.