पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ " त्यामुळे मराठ्यांच्या सैन्यांत फूट पडून हवशांस प्रतिनिधींवर उलट खाण्यास जोर सांपडला. इ० स० १७३२ पर्यंत प्रतिनिधि चिपळुणांत असतांना हबशांनीं गोवळकोट घेऊन मराठ्यांची फार नाचक्की केली. तेव्हां प्रतिनिधींनीं शाहु महाराजांकडे मदत पाठविण्याबद्दल एकसारखा तगादा लाविला. शाहु- महाराजांनीं चिमाजीआपांस प्रतिनिधींच्या मदतीस सैन्य पाठविण्याबद्दल अनेक वेळां आज्ञापत्रे पाठविलीं; परंतु त्यांजकडून वेळेवर मदत गेली नाहीं. त्यामुळे शाहु महाराजांनी त्यांजवर संतापून जाऊन, "तुझी जर मदतीस गेलां नाहीं, तर मी स्वतः जाईन." असें खरमरीत पत्र लिहिले. तेव्हां त्यांनीं आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यापैकी थोडासा उतारा मासल्याकरितां येथे देतों. बकाजी नाईक ह्यांनीं "सिद्दी साद सारा गनीम हटी मारून काढून, किल्यांत घालविला. तो श्रीपतराव श्रीस्थळीं येऊन, आपले नजरेनें युद्ध पाहिले. त्या उपर जयगडीहून भांर्डे आले व जमाव आला. गोवळकोटास मूर्चे देऊन जागा घ्यावा, तो राजश्रो प्रतिनिधि यांहीं गोवळकोटास अनुसंधान लाविलें. बकाजी नाईक यांची व प्रतिनिधींच्या भेटी जाहल्या तो मजकूर प्रतिनिधीनें घातला की, गनीम सुलाखे करून घेतों, तुझांस भांडावयासी प्रयोजन नाहीं. या उपरी बकाजी नाईक याहीं बोली केली कीं, अंजनवेलीस तुझीं जावें, तो जागा घ्यावा, गोवळकोट आह्मी घेतों. ते कबूल करीत ना. त्याकडील अनुसं- धान चाललें. सिद्दी सादाची भेटी जाहली. त्यास प्रतिनिधि बकाजी नाईक यांसी ह्मणत की, तुझी आह्मीं गनीम घेऊं जागा सचंतर हातीं देत नाहीं. त्यावरून पाहतां जागा आपण जेर करावा, मेहनत करून यशास पात्र ते होणार, आपणास प्राप्तांश नाहीं. हा प्रसंग जाइलियासी तेथे राहून काय करणे असे ? तशाहीमध्ये राहिल्यास, सुलाखे कार्य दिसगतीवर गेलें. ३० इ०" ह्याव- रून प्रतिनिधींनीं आंग्र्यांच्या सेनापतीस नाखूष करण्यांत मोठी चूक केली है दिसून येतें. मराठे सरदारांतील परस्परांविषयींचा अंतर्गत मत्सर व द्वेषभाव ह्या वेळेपासून वसत होताच. तो शाहु महाराजांच्या दराज्यामुळे कांहींसा दबला जाई. परंतु ज्या वेळीं तो डोकें वर उचली, त्या वेळीं मराठ्यांच्या हितास हानि- कारक झाल्यावांचून राहत नसे. १ ग्रांटडफ साहेबांनी ह्या शाहूच्या अस्सल पत्रांचा आपल्या इतिहासांत आ