पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ , हबशांचा एक पराक्रमी सरदार वश करून, त्याच्या मार्फतीनें, सर्व हबसाण मराठ्यांच्या राज्यास जोडण्याचा विचार केला. शेखजी हा जातीचा कोळी असून पुढे मुसलमान झाला होता; परंतु त्याच्या पराक्रमामुळे त्याजवर जंजि- याचे खान सिद्दी सुरूर ह्यांची फार मेहेरबानी जडली होती. त्यास मरा- ट्यांच्या सर्व आरमाराचं आधिपत्य, हबशांच्या ताब्यांतील सर्व मुलुखाची सुभे- दारी, कित्येक किल्ले व इनाम गांवें, आणि पेणपासून कोल्हापूरपर्यंत तळकोंक- णांतील सरगोंडपणाचा हक्क बहाल करून, आणि त्याच्या बंधूस रायगडची किल्ले- दारी व सैन्यांतील लोकांस एकलक्ष रुपये बक्षिसीदाखल देण्याचे मान्य करून, प्रतिनिधिप्रभृतींनीं विजय संपादन करण्याचा प्रयत्न चालविला होता. ब्रह्मेद्र- स्वामींचे परशुरामचे कारकून गणेश बहाळ ह्यांच्या ता० १९ आगष्ट ३० स० १७३० पत्रावरून (ग्रं० ले० ३३०) प्रतिनिधि हवशांच्या प्रांतांत उतरले होते, व सिद्दी सात ह्यांची काशीबंदरावर भेट घेऊन व त्यास घोडा नजर करून त्याशीं सलोखा करण्याच्या विचारांत होते असे दिसते. आंग्रे हे हवशांच्या विरुद्ध असल्यामुळे त्यास घालवून द्यावे, ह्मणजे मी राजदर्शनास येऊन तुम- च्याशीं तह करितों, असा सिद्दी सात ह्याचा मतलब होता. परंतु त्यांत खरे- पणाचा भाव मुळींच नव्हता. त्यामुळे पुढे कांहींतरी अनर्थ ओढवणार असे उघड दिसत होतें. त्यामुळे स्वामींच्या कारकुनानें 'दिवस पुढे सुधे दिसत ना- होत' असे उद्गार काढिले आहेत. सेखोजी आंग्रे हा राजनिष्ठ असून मराठी राज्याची सेवा आपल्या हातून व्हावी व हबशांचे प्राबल्य कमी व्हावे असे इच्छिणारा इमानी सेवक होता.. ह्याच्या पदरीं बकाजी नाईक महाडीक नांवाचा एक शूर सरदार होता. त्यानें हवशास अंजनवेल, गोवळकोट ह्या बाजूनें पुर्ता शह देऊन जेर केलें होतें. त्यामुळे त्याचा वेढा उठवून आलेला प्रसंग टाळावा या हेतूनें, सिद्दी सात ह्यानें प्रतिनिधींशीं गोड गोड गोष्टी चालविल्या होत्या. प्रतिनिधींस त्याचा मतलब न समजून त्यांनीं आंग्याच्या लोकांस बरोबर साहाय्य केलें नाहीं. १. ग्रंथमाला- 'मराठ्यांच्या इतिहासाची साधनें' लेखांक ३०५ ह्या पत्रांत, मथु- राबाई आंग्रे हिने प्रतिनिधींनीं सिद्दी सात ह्यांशीं सलोख्याचें बोलणे लावून बकाजी नाईकाचा कसा विरस केला, ह्याची साद्यंत हकीकत बोंद्र स्वामींस लिहिली