पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. •>0- श्रीमत् परमहंस ब्रह्मंद्रस्वामी हे थोर सत्पुरुष महाराष्ट्रांत अवतीर्ण होऊन त्यांनी मराठी राज्याच्या अभ्युदयास उत्कृष्ट रीतीनें साहाय्य केलें; परंतु आजप- र्यंत त्यांचें स्वतंत्र चरित्र किंवा पत्रव्यवहार ह्यांची चांगलीशी प्रसिद्धि झाली नाहीं. मराठ्यांचे इतिहासकार ग्रांटडफ साहेब ह्यांस, बोंद्रस्वामींचा व पेशव्यांचा अस्सल पत्रव्यवहार उपलब्ध झाला होता, ही गोष्ट त्यांच्या ग्रंथांतील कित्येक टीपांवरून सिद्ध होते. ग्रांटडफ साहेबांनी ह्या पत्रव्यवहारासंबंधानें एके ठि- काणीं असे स्तुतिपर उद्गार काढिले आहेत कीं:- “ बाजीरावांचीं व चिमणाजी आपांचीं पुष्कळ मनोरंजक पर्ने धावडशीकर स्वामी ह्यांच्या शिष्यवर्गाच्या वंशजांकडून मला कांहीं वेळ मिळालीं होतीं. हे स्वामी महाराष्ट्रामध्ये फार पूज्य सत्पुरुष होते. बाजीराव व चिमणाजी आपा ह्यांचे ते ‘महापुरुष' ह्मणजे गुरुवर्य असून, त्यांचा त्यांवर पूर्ण विश्वास होता. बाजीराव पेशवे ह्यांनी स्वामींस व चिमणाजी आपांस हीं पत्रे फार मोकळ्या मनानें लिहिलेली असून, त्यांत आपल्या आयुःक्रमांतील गोष्टी सविस्तर रीतीनें वर्णिल्या आहेत. त्यामुळे ती अगदी अमूल्य अशीं आहेत. ह्या पत्रांचें भाषांतर करून घेण्याची परवानगी मला मिळाली होती; परंतु त्यांच्या नकला करून घेण्याची परवानगी मला मिळाली नाहीं ! हीं अस्सल पत्र सातायाजवळील धावडशीनामक खेडेगांवीं स्वामींच्या शिष्यवर्गाजवळ अद्यापि आहेत.” * , Many interesting letters from BajeeRao and Chimnaji were lent to me by the descendants of the desciples of the • Dawarsee Swamee. The Swamee was a much venerated per- son in the country, and was the Mahapooroosh of BajeeRao and his brother, and seems to have possessed their entire con- fidence. The Peishwa's letters to the Swamee, and to his brother, detail the actions of his life in a famil hr manner, without disguise, and are quite invaluable. I was permitted to translate, but not to copy them. The originals continue in possession of the Swamee's desciples at Dawarsee, a village within a few miles of Satara. " 46