पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, 66 ग्रांटडफ साहेबांच्या ह्या उल्लेखावरून, स्वामींचा व पेशव्यांचा 'अत्यंत मूल्य- वान्' पत्रव्यवहार त्यांस उपलब्ध झाला होता, ह्यांत शंका नाहीं. प्रांटडफ साहेब सातारा येथें छत्रपति प्रतापसिंह ह्यांचे दरबारी ३० स० १८१८ पासून इ० स० १८२३ पर्यंत रेसिडेंटच्या हुद्यावर होते. त्या अवर्धीत त्यांनीं हीं पत्र पाहिली होती. त्यानंतर सुमारे अर्ध शतकपर्यंत मराठ्यांच्या इतिहासाचा अ थवा ब्रह्मद्रस्वामींच्या चरित्राचा मागमूसही नव्हता. पुढे इंग्रज सरकारच्या विद्यादानप्रसारामुळे इतिहासविषयाचं महत्त्व एतद्देशीयांस समजूं लागून, त्यावि षयींची अभिरुचि व आस्था त्यांचे ठिकाणीं उत्पन्न झाली; व लवकर मरा ठ्यांच्या इतिहासाची साधनें- म्हणजे जुने कागदपत्र व बखरी प्रसिद्ध करण्याचा उपक्रम “ विविधज्ञानविस्तार" व " काव्येतिहाससंग्रह " ह्या दोन मासिकपु- स्तकांच्या द्वारें मुरू झाला. ह्या उपक्रमामुळे ब्रह्मेद्रस्वामींचीं दहावीस किर- कोळ पत्रे व एक छोटीशी बखर मुद्रणयंत्रांतून प्रकाशित झाली; व ब्रह्मद्रस्वामींचें नांव व त्यांच्या चरित्राची अल्पशी माहिती हीं ऐतिहासिक जगास महशूर झाली. ह्या सुमारास ह्मणजे इ० स० १८७९ सालीं, पुणे येथील दक्षिणाप्राइझ कमिटीच्या जाहिरातीवरून, रा० सा० नागेशराव विनायक बापट ह्यांनी तयार केलेला “श्रीमंत थोरले बाजीरावसाहेब ह्यांचें चरित्र" नामक एक ऐतिहासिक ग्रंथ निर्माण झाला. ह्या ग्रंथामध्ये “महापुरुष " ह्या शिरोलेखाखालीं ग्रंथकारांनीं ग्रांटडफ साहेबांच्या इतिहासांतील तुटपुंज्या व अस्पष्ट माहितीच्या आधारें, ह्या स्वामींचें काल्पनिक परंतु हृदयंगम चित्र महाराष्ट्रवाचकांस सादर केलें. थोरल्या बाजीरा- वासारख्या प्रख्यात व पराक्रमी पुरुषाचे गुरु ह्या नात्यानें त्यांच्या चरित्रासंबं धानें सहज उत्पन्न होणारी जिज्ञासा, आणि साधुपुरुषांच्या रसाळ व प्रेमळ कथा श्रवण करण्याविषयींची स्वाभाविक आवड, ह्या दोन कारणांमुळे, रा० सा० बापट यांचे “महापुरुषाचे" चटकदार वर्णन लोकांस फारच आवडलें; व त्या योगानें ह्या महापुरुषाचा महाराष्ट्रवाचकांस चांगलाच परिचय झाला. दक्षिणाप्रा- इझ कमिटीचे सेक्रेटरी रा० रा० रावजीशास्त्री गोडबोले ह्यांनीं, रा० सा० बापट ह्यांच्या ह्या " महापुरुषा " च्या वर्णनाविषयीं अभिप्राय देतांना, असे लिहिले आहे कीं, “ह्या साधूच्या मठाचें आणि त्याच्या आसपासच्या स्थळाचें वर्णन या ग्रंथकर्त्यानं अतिशय मनोरंजक, मनांत ठसण्याजोगें आणि बोधपर असें केलें " , ,