पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. हरीभक्ति करी जन तारावया । स्वधर्मा विलया जाऊं नेदी ॥ जाऊं नेदी भक्ती जाऊं नेदी ज्ञान । अनुतापी मन निरंतर ॥ निरंतर भाव सगुणी भजन । येणे बहु जन उद्धरती ॥ उद्धरती जन करितां साधन। क्रियेचें बंधन आचरतां ॥ आचरतां साधू जना होय बोधू । लागतसे वेधू भक्तीभावें ॥ भक्तिभावें देव-प्रतिष्ठा पूजन कथा निरूपण महोत्साव ॥ महोत्साव साधू भक्तीचें लक्षण करी तिर्धाटन आदरेंसी ॥ आदरेंसी विधी करण उपाधी । लोकांतें सद्बुद्धी लागावया ॥ लोकाचार करी तो जना उद्धरी ज्ञाता अनाचारी कामा नये ॥ क्रियावंत साधू विरक्त विवेकी । तोचि तो लौकिकीं मान्य आहे ॥ रामदास.