पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ तास अतिशय उपसर्ग देऊन, मराठ्यांच्या ताब्यांतील मुलुखांतूनही वसूल बळज- बरीनें घेऊं लागले. तेव्हां, ब्रह्मद्रस्वामींनीं शाहु महाराजांच्या विचारें सेखोजी आंग्याचे साहाय्य घेऊन हवशांवर स्वारी करविण्याची मसलत उभारली. म राठ्यांचे इतिहासकार क्याप्टन ग्रांट डफसाहेब किंवा मराठी बखरीकार ह्यांनी ह्या स्वारीची हकीकत अगदर्दी त्रोटक व विसंगत दिली आहे; किंबहुना ग्रांट डफ साहेबांस ही गुप्त मसलत मुळींच समजली नाहीं, असें ह्मटले तरी चालेल. इ० स० १७३० पासून ३० स० १७३६ पर्यंत हें हवशी-प्रकरण चालले होते; व ह्याचे सूत्रचालक ब्रह्मंद्रस्वामी हे होते, असे उपलब्ध झालेल्या अस्सल पत्रव्य- वहारावरून व्यक्त होतें. इ० स० १७२९ ह्या वर्षाच्या अखेरीस बाजीराव बुंदेलखंडांतील व उत्तर हिंदुस्थानांतील राजकारणांत गुंतल्यामुळे, शाहु महाराजांनी हवशांच्या मसल- तीवर श्रीनिवास परशुराम प्रतिनिधि, जिवाजी खंडेराव चिटणीस, वगैरे मंडळींची योजना केली. त्यांनी शेख याकूब ऊर्फ शेखजी ह्या नांवाचा १ ह्या हबशी प्रकरणाची हकीकत ग्रांटडफ साहेबांस बरोबर न समजल्या- मुळे, अस्सल पत्र मिळूनही त्यांचा उपयोग त्यांस करितां आला नाहीं. त्यांनीं अवघ्या दोनतीन पृष्ठांत ह्या सहा वर्षे चाललेल्या प्रकरणाचा गोषवारा दिला आहे! पत्रांच्या तारखा न समजल्यामुळे ते अगदी बुचकळ्यांत पडून त्यांचा फार गों धळ उडाला आहे !! ह्याबद्दल त्यांनी टीपेमधें स्पष्ट लिहिले आहे कीं, “ In parts where I have only Mahratta authority, I am seldom quite certain of my dates, as many of the original letters have only the date of the week, and of the Moon." Page 233. अर्थात् ज्यास पत्रांच्या तारखा बरोबर समजल्या नाहीत, त्याला ह्या प्रकरणाचा नीट उलगडा करितां येणार नाहीं है साहजिक आहे. ह्या कारणास्तव ग्रांटडक साहेबांचे हे प्रकरण फार अपूर्ण व त्रोटक झाले आहे. आह्मांस जी थोडीबहुत नवीन माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या भागांत सादर करून, इबशी प्रकर णाचें खरें स्वरूप व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि ह्या सहा वर्षे चाललेल्या राजकारणाची सर्व गुंतागुंत पुष्कळ कागदपत्र मिळाल्यावांचून नीट उकलली जाणार नाहीं व त्याचा शिस्तवार इतिहास समजणार नाहीं.