पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ बहुत आहे. हुजुरून साहित्य गनिमास नतीजा पाठवावयाचें होत नाहीं. स्वामींनी आपले स्थळरक्षणास दुसरा पाठवून आपणांस मामल्यापासून मुक्त करावें ह्मणून विशदर्थे लिहिले. तर स्थळे स्वामींचीं; साहित्य करणे जरूर. तुझांसारखें एकनिष्ठ सेवक, कार्यकर्ते आजतागाईत श्रमसाहस करून स्थळे रक्षिलीं. पुढे तुमचा भरंवसा आहे. दसऱ्याकारणें स्वामी तुझांस हुजूर बोला- वतील. जें साहित्य फौजेचें लागेल, स्वामी करून देतील. आपले समा- धान असों देणे. दरमाहेच्या ऐवजाकरितां लोकांचा गवगवा झाला आहे; तरी दुसाला ऐवज चोवीस हजार रुपये पाठवून देणे. हुजूर दोन हजार स्वार व कारखाने पांच हजार माणूस बारा महिने सेवा करितात, त्यांचा ऐवज पत्रदर्शनीं पाठविणे.” . ह्या पत्रांत लिहिल्याप्रमाणे दसन्यास शाहु महाराजांची व कान्होजी आं- ज्याची भेट झाली. परंतु ह्यापुढे कान्होजी आंग्याकडून हवशांचा पराभव झाल्याचे दिसून येत नाहीं. सिद्दी सात हा दिवसेंदिवस अधिक अधिक बळावत चालला, व तो मराठ्यांच्या प्रांतास जास्त जास्त उपसर्ग देऊ लागला. सबा अशरीन ह्याच वर्षाच्या माघ महिन्यांत त्यानें हत्तीच्या निमित्तानें दंगा करून श्री परशुराम येथील देवालयाचा विध्वंस केला. त्याबद्दलची साद्यंत हकीकत दुसऱ्या भागांत दिलीच आहे. ह्यानंतर स्वामी हवशांच्या त्रासामुळे घांटावर आले. पुढे कान्होजी आंग्रे ह्यांची प्रकृति दिवसेंदिवस विघडत जाऊन ते इ० स० १७२९ च्या जून (जिल्हेज) महिन्यामध्यें मृत्यु पावले. कान्होजीस सेखोजी, संभाजी, मानाजी, येसाजी व तुळाजी असे पांच मुलगे होते. त्यांपैकीं वडील पुत्र सेखोजी ह्यास शाहु महाराजांनीं छ०५ मोहरम सन सल्ला- सीन (ता० २१ जुलई इ० स० १७२९) ह्या दिवशी सरखेलपदाचीं वर्षे दिलीं व कान्होजीकडे जो मुख व जे किल्ले होते ते त्याच्या ताब्यांत दिले. आंग्रे ह्यांच्या घराण्याशी स्वामींचा पूर्वीपासून स्नेहसंबंध असल्यामुळे त्यांनीं सेखोजीस वर्षे मिळवून देण्याचे काम मदत केली. सेखोजीची स्वामींवर चांगली भक्ति असून त्यांचा पुष्कळ पत्रव्यवहार चालत असे. कान्होजी आंग्रे त्याचा हबशांवर चांगला दाब होता, तो त्याच्या मृत्यूमुळे कमी झाला. त्यामुळे ते मोकळे होऊन अधिकच बेफाम झाले; व कोंकणप्रां-