पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ , विली. हा सरदार शूर असल्यामुळे त्यानें हवशास दाबांत ठेवून कोंकणप्रांतांतील मराठ्यांच्या सत्तेचें चांगले संरक्षण केले. परंतु पुढे त्याचें प्राबल्य विशेष वाहून तो ताराबाईच्या पक्षास वश झाला व सर्व कोंकणप्रांत बळकावून बसला. तेव्हां त्याचें पारिपत्य करून त्यास आपल्या ताव्यांत आणण्याकरितां, शाहु महाराजांनीं इ० स० १७१३ मध्ये आपले प्रधान बहिरोपंत पिंगळे ह्यांस कोंकणांत पाठ- विलें. परंतु कान्होजी आंग्रे ह्यानें त्यांचा पराभव करून त्यांसच कैद केलं. नंतर शाहु महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ ह्यांची त्या कामावर योजना केली. त्यांनीं आंग्र्याची पराक्रमशक्ति व सैन्यवल पाहून, त्याशीं युद्ध करण्याच्या भरीस न पडतां, सलोख्यानें कार्यभाग साधून घेतला. आंग्र्यास दहा किल्ले व सोळा महाल सरंजामादाखल देऊन, त्यास 'सरखेल' हा किताब व मराठ्यांच्या आर मारांचा मुख्याधिकार दिला; आणि त्यास शाहु महाराजांच्या पक्षास वळवून घेतलें. ह्या तहामध्यें हवशांचा कांहीं प्रांत मराठ्यांकडे आला. त्यामुळे त्यांचें व आंग्याचें युद्ध सुरू झाले. तेव्हां वाळाजी विश्वनाथ ह्यांनीं आंग्याच्या साहाय्यास जाऊन हबशांशी ता० ३० जानेवारी इ० स० १७१५ रोजी तह केला. ह्यानंतर बरीच वर्षे हबशांनीं कांहीं गडवड केल्याचे दिसत नाहीं. हव शांचा मुख्य अधिकारी याकूबखान सिद्दी सुरूर हा स्वतः भला माणूस होता; व आंग्याचाही त्यांजवर चांगला दाब होता. त्यामुळे त्यांचा व मराठ्यांचा फारसा विग्रह झाला नाहीं. परंतु पुढे सिद्दी सात नामक हबशी सरदार प्रबल होऊन त्यानें हिंदुलोकांसीं वैर संपादिले, व आंग्र्यासही वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. तेव्हां मराठ्यांस त्याचा समाचार घेणे भाग पडलें. कान्होजी आंग्रे एवढा प्रबल सरदार, परंतु त्यासही आपली स्थळे जतन कर ण्याकरितां शाहु महाराजांची मदत मागण्याचा प्रसंग आला. छ० १ जिल्हेज सबा अशरीन मया व अलफ (इ० स० १७२६) रोजीं कान्होजी आंग्रे ह्यास शाहु महाराजांनी जे पत्र पाठविले आहे त्यावरून शामलाचा उपद्रव बराच सुरू झाला होता असे दिसतें. हे पत्र येणेप्रमाणे :- “राजश्री कान्होजी आंग्रे सरखेल यांस पत्र जे, खंमस व सन सीत दुसाला बाराहजार रुपये येणें. माणसें पाठविलीं. त्यास तुझीं लिहिलें कीं, शामल व वरकड शत्रंचा उपद्रव तुझांकडे दरमाहाचे सन त्यास तुझांकडे हुजुरून