पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ भाग ४ था. ->0- आंग्रे व हबशी ह्यांजकडील राजकारणे. ब्रह्मद्रस्वामी महाराष्ट्रप्रांतांत आल्यानंतर त्यांच्या अनुसंधानानें जीं राजकारण घडून आलीं, त्यांत हबशी व आंग्रे ह्यांजकडील राजकारणे प्रमुख होत असें मानावयास हरकत नाहीं. कोंकणप्रांतांत हवशानें देवब्राह्मणांचा उच्छेद करून एकसारखा उपद्रव मांडिला होता; तेव्हां त्याचें पारिपत्य होऊन महाराष्ट्रधर्माचें मुख्य व्रत जें गोब्राह्मणप्रतिपालन व प्रजासंरक्षण तें सिद्धीस जावें हा स्वामींचा मुख्य हेतु होता. त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रांत आल्यानंतर शाहु महाराजांची मर्जी प्रसन्न करून, त्यांच्याकडून हबशांच्या प्रांतावर स्वारी करवून, त्याचें निर्मू- लन करण्याचा संकल्प करविला. आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या मराठ्यांच्या इति- हासामध्यें ह्या राजकारणांची बरोबर माहिती दिलेली नाहीं, व त्यांत स्वामींचा संबंध किती होता ह्याचा तर मुळींच उल्लेख नाहीं. परंतु, ह्या राजकारणासंबं धानें जो अस्सल पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे, त्यावरून, त्यांत स्वामींचा पुढाकार मुख्यत्वेकरून असून, त्याची सर्व सूत्रे त्यांच्याच तंत्रानें चालत होतीं असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाहीं. सिद्दी सात ह्यानें श्री परशुराम येथे जो अनर्थ केला, त्याबद्दल त्याचा उच्छेद लवकरच होईल ह्मणून स्वामींनीं अभिश्राप दिला होता. तो महाराष्ट्रांत येऊन स्वामींनीं सिद्धीस नेला, हे ह्या राजकारणांचें पर्य वसान आहे. ह्मणून ह्या संबंधाची संक्षिप्त हकीकत ह्या भागामध्ये द्यावयाचें योजिले आहे. कोंकणप्रांतामध्यें हबशी व कान्होजी आंग्रे ह्यांचा अंमल होता. इ० स० १६९० मध्ये रायगड घेतल्यानंतर औरंगजेबानें तो किल्ला व अंजनवेल व सिंधुदुर्ग हे रत्नागिरी जिल्ह्यापैकी दोन तालुके त्या वेळचा हवशांचा मुख्य अधि- पति सिद्दी कासीम ह्यास बक्षीस दिले होते. पुढे राजाराम महाराज चंदीस गेल्यानंतर सर्व कोंकणप्रांतामधील मराठ्यांचा अंमल कमजोर झाला. त्या वेळी हवशानें आपले पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली. तेव्हां राजाराम महारा- जांनीं कान्होजी आंग्रे ह्या प्रमुख सरदाराकडे सर्व कोंकणप्रांताची व्यवस्था सोंप- .