पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ कीं, “आतां नित्य उठोन कर्जदारांचे पायां पडावें शिलेदारांचे पायां पडतां पडतां कपाळ छिनत चाललें !! आतां ह्रीं सुख आह्मांस नकोत. तुझी या आणि आपला कारभार सांभाळा. अगर टाकून द्या ह्मणाल तरी टाकोन उठोन येतों. वरकड, तुझीं आपल्या पैशासाठीं लिहिले, तरी स्वामीनें कांहीं चिंता न करावी. आमचा जीव आहे तों पैकियाची काय चिंता आहे ? कोणे समयीं पाहिजे तें आह्मांसही मिळते. पैका पावता करूंच. आतां प्रस्तुत तो आमचा जीवच आहे. येथे येऊन घेणे, अगर तेथे बोलावशील तरी सर्व संग टाकून येतो. तुझीं थोर देव. तुझांस वचनास धरावें तें वचन खरें न झाले ह्मणून आह्मीं लेकरांनीं तुमची रड तुझांपाशीं रडावी, आणि रडतियाची अशी तुझी पुसोन परिणाम त्याचा कराल तो कराल. तुमचें झाड लाविलें तोडाल तरी आतां तोडा. वाढवाल तरी वाढवा. या गोष्टीस नादर कोण आहे ? तुमचे दवावणीस आह्मी कां भिऊं ? मारशील तरी तूंच बावा मारशील. यांतही कीर्ति तुझीच आहे आणि आह्मां लेकराचे लडिवाळ चालवून कीर्ति- रूप होशील तरी तूंच होशील." (लेखांक ३२). ह्यावरून द्रव्यसंबंधानें बाजी- राव अतिशय पेचांत आल्यामुळे स्वामींची कशी मनधरणी करीत होते हैं व्यक्त होते. ही सर्व पत्र मूळापासून शेवटपर्यंत खुद्द बाजीराव पेशवे ह्यांच्या हातचीं आहेत; व त्यांत सर्व हृद्गत अगदीं मोकळ्या मनानें वर्णिले आहे. बाजीराव पेशवे ह्यांच्या पत्रांत "तुमचें झाड लाविलें, तोडाल तरी आतां तोडा. वाढवाल तरी वाढवा.” हा जो मुख्य भाव आहे तोच बहुतेक मराठे सरदारांच्या पत्रांतही दिसून येतो. त्यावरून, पर्यायानें, स्वामींच्या आशीर्वादाने किंवा कृपाप्रसादानें सर्व मराठे सरदार उदय पावले, व त्यांच्या हृदयांत स्वधर्माभिमान व स्वदेशभक्ति ह्या दोन गुणांची ज्योती प्रज्व लित होऊन मराठी साम्राज्याचा अभ्युदय झाला, असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. स्वामींनी मराठे सरदारांची मनें आकर्षित करून त्यांच्या ठिकाणीं स्वप राक्रम व्यक्त करण्याची कशी प्रेरणा केली व त्यांच्याकडून महत्कायें कशीं सिद्धीस नेलीं ह्याची कल्पना, त्यांच्या सर्व पत्रव्यवहाराचें सूक्ष्मदृष्टीनें परिशीलन केल्यास, सहज होण्यासारखी आहे. तथापि, ती अधिक रीतीनें मनांत विंबण्याकरितां त्यांच्या काही प्रमुख राजकारणांचा वृत्तांत पुढील भागांत सादर केला आहे. ● , ●