पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० भिला. प्रत्येकास आशीर्वाद द्यावा व त्याचें कार्य सिद्धीस गेलें ह्मणजे श्री भार्गवाच्या नांवाने त्याजकडून यथाशक्ति द्रव्य घ्यावे, हा स्वामींचा वर्तनक्रम असल्यामुळे त्यांच्या सर्व पत्रांमध्ये द्रव्याचा उल्लेख दृष्टीस पडतो. परंतु हें द्रव्य- संपादन कोणत्याही स्वार्थबुद्धीने केलेले नसून, केवळ लोकोपयोगासाठीं व देशका- र्यासाठीं होतें, हैं वाचकांनी पूर्ण लक्षांत ठेविले पाहिजे. ह्या भिक्षाद्रव्याने स्वामींनी महाराष्ट्रामध्ये अनेक सार्वजनिक उपयोगाचीं कामें केलीं; आणि अनेक सरदारांस आणि छत्रपति व पेशवे ह्यांस संकटप्रसंगीं उत्कृष्ट साहाय्य करून त्यांच्या स्वराज्यवृद्धीच्या सत्कार्यात येणाऱ्या अडचणी नाहींशा केल्या. आंग्रे ह्यांस स्वामींनी कोंकणांत असतांनाच द्रव्यसाहाय्य केल्याचे उल्लेख त्यांच्या पत्रांत आहेत. त्यावरून हा द्रव्यसंपादनाचा क्रम स्वामींनी परशुरामीं प्रकट झाल्यापासून सुरू केला असावा असे दिसतें. ह्या द्रव्याच्या जोरावर त्यांनीं मोठमोठीं सार्वजनिक कामें केलीं, गरीब लोकांस मदत केली, सरदार लोकांस खूष केलें; इतकेच नव्हे तर राजकीय मोहिमाही सिद्धीस नेल्या. ही गोष्ट सामान्य नव्हे! लोकांकडून भिक्षाद्रव्य संपादन करून त्याचा इतका सत्कारणी विनियोग करण्यास देखील चातुर्य व शहाणपण लागते. ते स्वामींच्या ठिकाणीं पूर्ण होतें असे मानण्यास कांहीं हरकत नाहीं. स्वामींचें कर्ज महाराष्ट्रांतील बहुतेक प्रमुख सरदारांकडे होतंच, परंतु पेशव्यांकडे लाखों रुपयांनी मोजतां येईल इतके कर्ज होतें. पेशव्यांस निरनिराळ्या मोहिमांमध्यें मनस्वी खर्च लागत असे व त्यामुळे ते कर्जानें अगदीं ग्रस्त होत असत. त्या वेळी त्यांना स्वामींवांचून दुसरा कोणी साहाय्यकारी नसे. बाजीराव पेशवे ह्यांची कर्जासंबंधाचीं जीं पत्र आहेत, तीं वाचून पाहिलीं ह्मणजे कोणाचेही हृदय द्रवून गेल्यावांचून राहत नाहीं. बाजी- राव एका पत्रांत स्वामींस लिहितात कीं, “आह्मांस कर्जीने बुडविलें ! एवढे गोष्टीकरितां प्राण जाता तरी बरें होतें !! विष खाऊन मरावे इतकेंच, किंवा स्वामींचे पाय धरून बसावें इतकाच पदार्थ उरला आहे! दरबारी सर्व साहित्य आमचें करणार सर्व आपल्यास विदितच आहे. तरी स्वामींस कृपा येईल तरी आह्मी कर्जापासून मुक्त होऊं. लोकांचे नरकवासापासून दूर होऊं तो पदार्थ करावा. तरीच मज बाळकावर पूर्ण कृपा आहे" (लेखांक ३०). दुसऱ्या एका पत्रामध्ये तर बाजीरावांनीं अगदीं वैतागून जाऊन स्वामींस लिहिले आहे