पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अयं निजः परो वेति गणना लघुचेतसां । उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम् ॥ १ ॥ ह्या नियमाप्रमाणं हा माझा किंवा हा परका असा क्षुद्र भेद न बाळगतां सर्व वसुधा हेच आपले कुटुंब अर्से मानितात. असाच प्रकार स्वामींचा, निदान महाराष्ट्रासंबं धानें तरी, पुष्कळ अंशीं होता, असें ह्मटले असतां क्वचितच अतिशयोक्ति होईल. , , इ० स० १७२८ मध्यें स्वामी वरघाटें आल्यानंतर त्यांनी सर्व महाराष्ट्री- यांची अंतःकरणें आपल्या अलौकिक शक्तीनें आकर्षित करण्यास कसा प्रारंभ केला हें विस्तारेंकरून सांगण्याची विशेष आवश्यकता नाहीं. त्यांचीं जीं पत्रे उप- लब्ध झाली आहेत, तेवढ्यांवरून त्यांचे चित्र डोळ्यांपुढे पूर्णपणे उभे राहतें. बाजीराव ह्यांस पेशवाईचीं वस्त्रे मिळवून देण्यास स्वामींचें किती साहाय्य झाले हे सांगण्यास स्पष्ट पुरावा नाहीं. तथापि शाहु महाराजांजवळ त्यांची वारंवार शिफारस करून त्यांचे उत्तम गुण छत्रपतींच्या नजरेपुढे आणण्यास स्वामी किती तत्पर असत हे दाखविण्यास सबळ पुरावा आहे. शाहु महाराजांची व ब्रह्मेद्र- स्वामी ह्यांची धावडशी येथें इ० स० १७३४ मध्यें जी भेट झाली, त्या भेटीमध्यें “राजश्रीजवळ तुमची फारशी शिफारस केली. कित्येक तुमच्या स्वहिताच्या गोष्टी सांगितल्या" ह्मणून स्वामींनी बाजीरावांस पत्र लिहिले. त्याचे उत्तर लिहितांना बाजीराव पेशव्यांनीं भक्तिभावाने लिहिले की, “मायबाप देवधर्म स्वामींचे पाय न्यूनपूर्ण सर्व स्वामींचें आह्मी स्वामींचे चरणांकित सर्व चिंता स्वामींस आहे. तेथे आमची शिफारस व बऱ्याच्या गोष्टी सांगितल्याचें अपूर्व काय ? आमची निष्ठा त्रिकर्णपुरस्सर स्वामींच्या पायापाशीं आहे. तेथें विस्तार आह्नीं काय लिहावा" (लेखांक २९ ). ह्यावरून स्वामींनीं बाजी रावांस कसें साहाय्य केले ह्याची कल्पना करितां येते. बाजीरावांचीं अत्यंत प्रेमळ भावाने लिहिलेलीं व भक्तिरसानें पूर्ण उचंबळलेली अशीं जीं अनेक पत्रे उपलब्ध झाली आहेत, तीं पाहिलीं ह्मणजे त्यांची स्वामींवरील पराकाष्ठेची निष्ठा व त्यांच्या अलौकिक कर्तृत्वशक्तीविषयों पूर्ण भरंवसा दिसून येतो. स्वामींनीं स्वदेशकल्याणार्थ आपलें गुप्त स्वरूप एकीकडे ठेवून राजकारणांत ज्या वेळीं प्रवेश केला, त्या वेळेपासून संसारी मनुष्याची वृत्ति धारण केली. आणि देवाच्या भिक्षेच्या निमित्ताने सर्व सरदारांकडून कांहीं द्रव्य घेण्याचा क्रम आरं