पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ , णांचं दर्शन घेऊं लागले व त्यांचें चरणरज ह्मणवूं लागले. स्वामींची सर्वांवर पराकाष्ठेची प्रीति असून ते त्यांच्या बरोबर फार प्रेमळ अंतःकरणानें वागत असत. त्यामुळे सर्व सरदार आपल्या सुखदुःखाच्या हद्गत गोष्टी स्वामींजवळ मोकळ्या मनानें सांगून त्यांचे निराकरण स्वामी सांगतील त्या मार्गाीनें करीत असत. स्वामींसही मनुष्यास राजी राखून, त्याच्या पोटांत शिरून, त्याशीं मवाळ भाषण करून, त्याचें अंतःकरण वेधून घेऊन, त्याजकडून महत्कार्य करून घेण्याची विलक्षण हातोटी साधली होती. त्यामुळे सर्व लहान मोठे सरदार स्वामींचे निस्सीम भक्त बनून एकसमयावच्छेदेंकरून स्वराज्याभिवृद्धीच्या कामास लागले. त्याचा परिणाम, शाहु महाराजांच्या कारकीर्दीत, मराठी साम्राज्याचा आसेतुहिमाचल झालेला विस्तार हाच होय. , , इ० स० १७२८ पासून ३० स० १७४५ पर्यंत, महाराष्ट्रांत जीं जीं राजका- रणें झाली, त्या सर्वात स्वामींचें अप्रत्यक्षरीतीनें कांहींतरी अंग होतें, असें ह्मण- ण्यास हरकत नाहीं. ह्या सर्व राजकारणांचें खरें व पूर्ण स्वरूप दाखविणारे कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांचें विस्तारेंकरून विवरण करितां येत नाहीं. तथापि बहुतेक सरदारांस नांवारूपास आणण्यास, त्यांची शिफारस करण्यास, त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यास, त्यांना प्रोत्साहन देण्यास व त्यांची योग्य कामावर योजना करण्यास स्वामीच बहुतेक अंशीं कारण असत. स्वामींचा संबंध नुसता महत्त्वाच्या राजकारणांतच नव्हे, परंतु अगदी घरगुती सामान्य गोष्टींतही दिसून येतो. स्वामींवर पुरुषांप्रमाणे बायकांचीही फार भक्ति असे. त्यामुळे मराठे सरदारांच्या बायकाही आपल्या मुलांस स्वामींनी आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण करावें असें इच्छीत असत. बाळाजी विश्वनाथाची बायको राधाबाई, मल्हारराव होळकराची बायको गौतमाबाई, पिलाजी जाधवरा- वाची आई हंसाई, रघोजी भोसल्याची आई काशीबाई, मानाजी आंग्याची आई मथुराबाई, इत्यादि वीरपल्या व वीरमाता स्वामींशीं अत्यंत घरोन्यानें व भक्तिभावानें पत्रव्यवहार करीत असत, व आपल्या मुलांचे कल्याण करण्याकरितां स्वामींचा आशीर्वाद रात्रंदिवस चिंतित असत, असें त्यांच्या अनेक पत्रांवरून दिसून होतें. अर्थात् सर्व महाराष्ट्रास स्वकीय मानून त्यांच्याशीं स्वामी एकरूप झाले होते ह्यांत शंका नाहीं. उदारचरित असे जे साधु पुरुष असतात ते ,