पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णागर वगैरे सुगंधी द्रव्ये व रोख रुपये नेल्याचेही दाखले आहेत. संभाजी शिंदे हे ३० स० १७३४ मध्ये मृत्यु पावले व त्यांचे जागीं तान्हाजी नाईक चाळके ह्यांची नेमणूक झाली. नंतर स्वामींनी रसाळगडाहून आपला ऐवज धावडशीस नेला. तो येणेप्रमाणें होताः- - नगद रुपये ६६१५ मोहरा १५६ होन २१ पुतळ्या ५७ ह्यापुढे स्वामींचा कोंकणांतील देण्याघेण्याचा संबंध बहुतेक कमी होऊन त्यांचा सर्व व्यवहार महाराष्ट्रांतच होऊं लागला. शाहु महाराज व त्यांच्या राण्या सकवारबाई, सगुणाबाई, व विरुवाई ह्यांनीं स्वामींचा विशेष अगत्यवाद धरिला. यामुळे स्वामींचीही त्यांच्यावर विशेष कृपा होऊन परस्पर प्रेम जडले. त्यामुळे स्वामींस छत्रपतींची मर्जी प्रसन्न पाहून त्यांच्याकडून वाटेल तें कार्य करून घेतां येऊं लागले. अर्थात् शाहु महारा- जांस कोणतीही गोष्ट कळविण्यास व त्यांजकडून वाटेल तें कार्य करून घेण्यास स्वामी समर्थ आहेत असे पाहतांच, सर्व सरदार स्वामींच्या द्वारां तिकडे जाऊं लागले. शाहु महाराजांची कोणावर अवकृपा झाली तर ती युक्तीनें दूर कर- ण्यास, किंवा एखाद्या राजकारणांत कोणास योग्य सल्ला मसलत देण्यास, किंवा एखाद्याची छत्रपतीजवळ शिफारस करण्यास, स्वामी हैं एक उत्कृष्ट साधनच होऊन राहिले. स्वामी स्वतः स्वार्थनिरपेक्ष, स्पष्टवादी आणि स्वराज्यहित- चिंतक असल्यामुळे त्यांचे शाहु महाराजांवर विशेष वजन पडून, त्यांच्या एका शब्दानें वाटेल तें कार्य होऊं लागले. त्यामुळे सर्व लहान मोठे मराठे सरदार स्वामींच्या विचाराने आपली राजकारण करूं लागले. स्वामी अगोदर तपस्वी, वरदी, सत्पुरुष, ह्यामुळे त्यांच्याविषयीं भाविक जनांस स्वाभाविकपणेच पूज्यबुद्धि वाटत असे. त्यांतून त्यांचा छत्रपतींशी अशा प्रकारचा सन्निकट संबंध असल्या- मुळे, त्यांना स्वामींचा कृपाप्रसाद, आत्मकल्याणास, ऐहिक व पारमार्थिक ह्या दोन्ही दृष्टींनीं, अत्यंत आवश्यक वाटू लागावा है साहजिक आहे. ह्या कारणास्तव पेशवे, प्रतिनिधि, सचीव, शिंदे, होळकर, पवार, जाधवराव, पुरंधरे, आंग्रे आदिकरून मोठमोठे सरदार व इतर सर्व सामान्य लोक स्वामींच्या चर ,