पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ वर्ष द्वादश यापरि गेल्यावरि की मंरीचिनगरास ॥ चिमणाजीसुत नेले रघुनाथें स्वक्षयार्थ नगरास ॥ २२ ॥ वर्ते नवल पुढे बहु आले ब्रह्मंद्र दोन यामिं दिवा ॥ सर्व स्तवितां बदले रक्षा जो लाविला मिं कीर्तिदिवा ॥ २३ ॥ चिंता न करा येइल चिमणाजीतनय अष्ट दिवसांत || कांहीं बंध नसे त्या, आहे समजा मनीं स्ववासांत ॥ २४ ॥ पत्रे पुष्पें पूजुनि गेले मग घालवावया क्रोश |॥ तंव ते अदृश्य होतां रडती करिती बहूत आक्रोश ।। २५ ।। तिकडे दर्शन देउनि स्वामि जगन्नाथ यास कथि जा च ॥ मोहें रघुनाथेंही केला सत्कार फार, नच जाच ॥ २६ ॥ ६ , आले वसु दिवसांच्या आंत जगन्नाथ आपुल्या भवनीं ॥ ऐशा ब्रह्मेद्रा जो गाय तया होय गेहिं लांभ वनीं ॥ २७ ॥ दिधली मती जसी मज गणराजाने तसेंच या वदनें ॥ वदलों तहासाचे गुण मी, सांगुनि तयासि मम मद ने ॥ २८ ॥ ठेवी चरित्र जो हैं अथवा सदनीं पुजील सद्भावें ॥ वाची नित्य; तयानें स्वानंदें सुरगणांत शोभावें ॥ २९ ।। रचिली पंचाध्यायीं जाळाया सर्वही दरिद्वास ॥ नाकीं वास मिळाया बालात्मज दिव्य भालचंद्रास ॥ ३० ॥ इति श्रीब्रह्मंद्रचरिते महायाज्ञिकवैराजक्षेत्रस्थबाळदीक्षितात्मज भालचंद्रकृते पंचमोध्यायः समाप्तः ॥ १ सूर्यलोकास. २ जगन्नाथपंत. ३ रघुनाथ बाजीराव ऊर्फ राघोबादादा ह्यांनीं जगन्नाथपंत झांस कैद केलें होतें. ४ आपल्या नाशार्थ ५ दोन प्रहर ६ छल, ७ घरीं अथवा रानांत कोठेंही लाभ होईल असा भावार्थ ८ माझा अहंकार नाहींसा कर असे सांगून.