पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ गर्तेमाजीं बसवुनि शंखें भेदी शिरा जगन्नाथ ॥ करुनी समान भूमी बोलति रक्षी अह्मांसि गुरुनाथ ॥ १० ॥ गेला स्वस्थाना नृप सांगुनि सर्वांस नीट परिसा रे ॥ द्वादश वासर करणे कर्मविधी जपुनि धर्म बहु सारे ॥ ११ ॥ गेल्यावरि शाहु, पुढे करिति जगन्नाथ तत्क्रिया सारी ॥ धुमणी दिन, परि झाले त्या दुःखें बहु विरक्त संसारीं ॥ १२ ॥ येतां दिन तेरावा नृपजायेनें समग्र पाठविलें ॥ साहित्यासि; बहु परी चित्तीं शतवार दुःख आठविलें ॥ १३ ॥ बहु विप्र, अन्य तैसे, जेवविले कोण करिल संख्या ती ॥ अन्नाचे गिरि उठले इहपरलोकींहि वाढली ख्याती ॥ १४ ॥ भूपें पाचारूनि मग भक्त जगन्नाथ बापु धुंडीस ॥ वस्खें देउनि बदला धाडुं नका नाकिं पापहुंडीस ॥ १५ ॥ सांगे भूपस्त्री मग गुरुचा प्रासाद हो करा अचल ॥ न्या वसु वांछित परि कधिं भंग न व्हावा तया जसा अचल ॥१६॥ आणुनि निधि तद्वाक्ये करिति जगन्नाथ आलयारंभा ॥ तंव ती सगुणा गेली कैलासा त्यजुनि राष्ट्र कीं शोभा ॥ १७ ॥ भूपानें मग कथिलें न्यावें तैसेंचि शेवटा काम ॥ मेल्यावरि मी राहिल ऐसें मज वाटतेंचि गुरुधाम ॥ १८ ॥ होतां अर्धालय तें गेले शाहू त्यजूनि राज्यास | भोगाया स्वर्गसुखा, करिती मग सर्व लोक कज्ज्यास ॥ १९ ॥ प्रासादासी नेले सर्वांनीं शेवटासि त्या मिळुनी ॥ घेती सुखासि मानुनि स्वामीगतदुःखशोक तो गिळुनी ॥ २० ॥ प्रत्यब्दीं दशदिन ते करिति महोत्सव गुरूसि सुखवाया ॥ देऊनि अन्नदाना सुकृत गुरूचें जनांत कळवाया ॥ २१ ॥ १ यथासांग, संपूर्ण. २ मुख देण्याकरितां.