पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ आले स्वानंदाहुनि मोदामोदादि दूत गणपतिचे ॥ पोडशदलयुत सौभीं नेले बसवुनि गणेश सुरतीचे ॥ ३७ ॥ कथिलें यतिनिर्याणा करुनी चवथा समाप्त अध्याय ॥ गुरुसी, दीक्षितवंशज बालात्मज भालचंद्र हा ध्याय ॥ ३८ ॥ इति श्रीब्रह्मेद्रचरिते भालचंद्र अयाचितकृते चतुर्थोध्यायः समाप्तः ॥ अध्याय पांचवा. आर्या. हरिहर शक्ति रवीही पूजुनि तुमच्या पदासि गणपाला ॥ वांछित पावति तरि मज गाया धी दे तव प्रतापाला ॥ १ ॥ शब्द न होतां ह्मणती कोणी बहु लागली असे निद्रा ॥ पाहतां त्यासि जगोबा देखियलें जीवहीन मुखचंद्रा ॥ २ ॥ क्रोधेन वर्षी गेले पोडश शत सप्तपष्टि भृगुवारीं ॥ अरुणोदय सित नवमी पंचममासींच भक्तकैवारी ॥ ३ ॥ पाठविला शाहुकडे खंडोजी सांगुनी सकलवृत्ता ॥ आमात्यासह नृप मग आला योजावयासि सार्थकता ॥ ४ ॥ त्या तनुला कृष्णेचें घालविलें स्नान नमुनि भूपानें ॥ पूजन विधियुत करवुनि बोले त्यजिलीं मुलेंच बापानें ॥ ५ ॥ भूपाले सर्वांचें करुनि समाधान योगनिष्ठास ॥ घालुनि शिबिकेमाजी अणिलें स्वस्थानिं करुनि कष्टास ॥ ६ ॥ आणुनि धावडशीला जेथें संध्येस गा बसत होते ॥ गर्ता खाणुनि तेथें, येथें स्थापा ह्मणें कुशल हो ते ॥ ७ ॥ सारुनि यतिविधि बोले अवसानीं आसना न कां वळलें ॥ आतां घडेल कैसें तंव हैं स्वामींस अंतरीं कळलें ॥ ८ ॥ धरुनी पदासि करितां होय जगन्नाथ आसनां कर्मल ॥ वानिति साधूचे गुण ह्मणती याची तनू असे विमलं ॥ ९ ॥ १ क्रोधन संवत्सर २ योगीराजास ३ निर्याणसमय ४ आसन मांडी. ५ पवित्र, शुद्ध.