पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ साश्रुपणे सांगितलें, फडणीशत्वा न सोडि बापूजी ॥ गेलों नाकीं जरि मी सद्भावें पादुकेसि वा पूजीं ॥ २५ ॥ यापरि सर्वांचें बहु करुनि समाधान, तेचि संन्यासी ॥ ॥ घेउनि संगें निवती एक जगन्नाथजी न अन्यासी ॥ २६ ॥ चिमणाजीच्या स्त्रीतें प्राशाया ह्मणति दे मला तक्र ॥ देतां प्राशुनि गेले भेदाया मृत्युचें सुखें चक्र ॥ २७ ॥ वाजीवाहन मार्गी च्यूतद्रुम देखतां विसाव्यास || घेउनि पलार्ध आले, कृष्णेच्या तटिं दुजा जसा व्यास ॥ २८ ॥ नंतर बसले घालुनि दिव्यासन यति चिनोन दारास ॥ ठेउनि दोन, जगोबा रक्षाया दूत येत नगरास ॥ २९ ॥ तेव्हां दुश्चिन्हें बहु होती नक्षत्रपात रडति शुनी ॥ स्वप्नीं माहिपदर्शन धरिलें मिळुनी किं उष्ट्र बहु शिशुनीं ॥ ३० ॥ होतां वसुदिन आंतुनि ह्मणती दूता कवाड मुक्त करा ॥ नसतां पूर्ण समाधी अमुच्या हें काय कृत्य उक्त करा ॥ ३१ ॥ पुसती दूता है कथ कोणाचे गज पदाति रथ बाजी ॥ आला नृप कीं उपनृप? ह्मणती एकहि दिसे न वा वाजी ॥ ३२ ॥ हेरंब श्रीगणपति मयुरेश्वर धुंडिराज हेच मुखीं ॥ उच्चारी न दुर्जे तो होईल खलु पुरुषमान्य ब्रह्ममुखीं ॥ ३३ ॥ • धाडी सांगुनि दूतां मधु मात्रा आणि हेमगर्भ तसा ॥ घेउनियां जा सत्वर आण जगोबास शोककिलगतसा ॥ ३४ ॥ दूत स्वामीवृत्ता बोलुनि बसतां निधे जगोवा कीं ॥ चित्त ह्मणे अहाहा वेळा आली अह्मां कसी बाकी ॥ ३५ ॥ इकडे इंद्र पडानन रुद्र हरीकादि हे विमानातें || विचरुनि नाकीं पाहति साधूच्या करिति कोण मानते ॥ ३६ ॥ १ डोळ्यांत आसवें आणून. २ कोल्हीं. ३ आठ दिवस. ४ स्वामींच्या समाधीचे पूर्ण दिवस होण्यापूर्वी कवाड उघडणे आपल्या हातांस योग्य नव्हे असा भावार्थ दिसतो.