पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ येउनि तोपें ह्मणती आहे कीं भूप सांग गेला बा ॥ आहे वदतां सत्वर आण ह्मणे त्यासि जेंवि मूला ब ॥ १२ ॥ भूपासह यति निकटी येच जगन्नाथ त्यास नृप नमुनी ॥ बालक कृतापराधी तरि त्यावरि रोप हो करी न मुनी ॥ १३ ॥ सोडुनि निजासना यति तिष्टुनि ह्मणती ममासनीं वैसा ॥ स्वकरें तत्कर धरितां नृपती बोले न धर्म मम ऐसा ॥ १४ ॥ वदति स्वामि तयासीं, बसणें तुज उक्त, होसि जामात ॥ माझी सुता तुझी स्त्री; बद यावरि काय भूभुजा मात ।। १५ ।। एवं विनोदपर बहु अर्ध घटी करिति भाषणे उभय ॥ प्रश्नद्वय यति भूपा सांगति बोलति धरूं नकोसि भय ॥ १६ ॥ ● कांहिं न मागे तुज परि जेव्हां मी गमन करिन नाकास ॥ संस्थानासि रक्षिल जो त्यास धरूं दे नृपा तुझी कास ॥ १७ ॥ स्वकरें यति मग देती पंताचा नृपकरीं अहो पाणी ॥ 'सुतसम रक्षीं' ह्मणतां आलें नेत्रीं तिघांचिया पाणी ॥ १८ ॥ करितों प्रश्न दुजा तुज कोठें माझी समाधि करशील ॥ आज्ञा कराल तेथें करिन ह्मणे भूप हेंचि मम शील ॥ १९ ॥ आहे सिद्ध समाधी केली पूर्वीच माळशिरसांत ॥ सुख मज येथे घेतां; तोडिन मग शत्रुकाळ शिरसांत ॥ २० ॥ मृगयेच्छा सांगितली शाहूनें मग यती ह्मणे जेवा ॥ होइल काज तुझें तरि वांछित पुढती असेचि तव ठेवा ॥ २१ ॥ अशना जातां येउनि सांत्र पशु पातला तडागांत ॥ नृप तो घेउनि गेला आनंदें स्वामिच्या पदा गात ॥ २२ ॥ भार्येचा जाणुनियां दर्शनहेतू नृपँहि पाठविलें ॥ सगुणा नाम तियेला, चित्तीं गुरुला सदैव सांठविलें ॥ २३ ॥ दिन मग कांहीं जातां बदले जाणें अह्मांस हो आतां ॥ परिसुनि वाणी करिती स्फुंदन, जी फार लागली चित्ता ॥ २४ ॥ १ बाप २ राजा. ३ गोष्ट. ४ स्वर्गास ५ माळशिरस गांवीं ६ मस्त- काचे ठिकाणीं. ७ सांबर, २३