पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ अध्याय चवथा. आर्या. धीपतिचरणसरोजीं सेविं कथेचे पराग धीभ्रमरा ॥ नकळे गुस्सी तरि तूं वंदुनि मग पूस; मान्य हो अमरा ॥ १ ॥ कळलें स्वामिस पूर्वी होइल पुढती निजावताराची ॥ शीघ्र समाप्ती ह्मणुनी बोलति वाणी हितोपकाराची ॥ २ ॥ एक दिनीं छत्रपती आले ब्रह्मेद्रदर्शनासाठीं ॥ सामोरा त्यांसि पुढे जाय जगन्नाथ, तोप धरि पोटीं ॥ ३ ॥ भूप पुसे यति कोठें ? सांगे हा स्वाश्रमींच आहेत ॥ आलों त्यांसि नमाया, दाखविं तरि बा धरूनि बहु हेत ॥ ४ ॥ येतां गुप्त स्वामी झाले मग नृप पुसे जगन्नाथा ॥ नसती येथें मम गुरु, ठेऊं कोणाचिया पदीं माथा ॥ ५ ॥ ऐका ह्मणे नृपाला होते स्थानीं मधां पहा याच ॥ आलों तिकडे तेव्हां सांगितलें ह्मणुनि मीं तुह्मां या च ॥ ६ ॥ भूपाले पाठवुनी नगरा चतुरंगिणी पुढें सेना ॥ एकटका शुद्धगृहीं राहे यतिचा वियोग सोसेना ।। ७ ।। ऐक जगोवा बसतों गुप्त, यती आलियावरी पूस ॥ करुणावचनें दवडीं रोप जसा वन्हि जाळि कापूस ॥ ८ ॥ गेलासा नृप जाणुनि अपरान्हीं स्वासनींच ये योगी ॥ दावितसे कोपातें जैशी बाळास दावि माय उगी ॥ ९ ॥ यतिसी पुसे जगोबा भूपावरि रोष कां न अपराधी ॥ उत्तर तो दे अमुचा ग्राम न सोडवि जयांत न पैरा धी ॥ १० ॥ आंग्र्याचें भूपाचें प्रस्तुत बहु वैर सांचलें ऐका ॥ आज्ञापालन न घडे तरि बाल त्याग करिल आई कां ? ॥ ११ ॥ ३ देवांस. १ गणपतीच्या चरणरूपी कमळांतील, २ बुद्धिरूपी भ्रमरा ५ ज्यांत दुसरा हेतु नाहीं. ४ चलाच झणून.