पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ मागें येउनि आपण केलें वस्तीस गांव धावडशी ॥ ह्मणति नृपा अयश तुला जरि जन येथील सत्य धावडेशी ॥ ३४ ॥ भार्गवरामीं जावें श्रावणमासीं समाधि घ्यायास ॥ स्वाधिन करिति तिघांच्या ग्रामादिक काज तें पहायास ॥ ३५ ॥ धुंडीराज तसे हे बापु जगन्नाथ मानिती आज्ञा ॥ एक विचारें असती ज्यांची शोभे जनीं महा प्रज्ञा ॥ ३६ ॥ निंबकर ग्रामस्थे अन्य बळें रेटिली पुढे सीमा ॥ अनयावाडिकरें हैं कथिलें स्वामिंस मुलास पोसी मां ॥ ३७ ।। निग्रहयुत यति जाउनि सक्रोधें बैसले सिवेंवरते ॥ कळतां शाहुनृपा हैं आला धांवुनि पुढें, पदींच रते ॥ ३८ ॥ ब्रह्मद्रप्रिय करुनी सत्कारुनि बैसवोनि खलु यानीं ॥ अणिलें गांवामाजी स्वस्थानीं नमुनि शाहुरायांनीं ॥ ३९ ॥ शिविका देउनि यतिसीं नम्रपणे एक गांव आणीक । दिधला निजराष्ट्राच्या उदयास्तव, मानि यासि माणीक ॥ ४० ॥ चिमणाजी मृत शोडश शतिं झाले या त्रिपष्टिं दुर्मतिते ॥ तत्सुत बराच बुधसा नाम जगन्नाथ ही न दुर्मति ते ॥ ४१ ॥ केली तडागरचना फोडुनि, पाषाण आश्रमाजवळ ॥ तैसी त्रिपुटनगावरि, सांगावें साधुचें किती नवल ॥ ४२ ॥ एवं सुभालचंद्रे साधूची वर्णिली कथा सुरसा ॥ तृतियाध्यायीं, तरि हो परलोकीं मुक्ति या स्थळीं सुरसा ॥ ४३ ॥ इति श्रीब्रह्मंद्रचरिते भालचंद्रायाचितकृते तृतीयोध्यायः ॥ श्रीभार्गवार्पणमस्तु ॥ १ जर येथील लोकांस तूं धांवण्यास लाविलेंस तर खरोखर तुला अपयश येईल अस स्वामींनीं हबशास सांगितले २ प्रज्ञा=बुद्धि. ३ मा=आई. ४ नमस्कार केला. ५ “ शके १६६३ दुर्मती संवत्सरी चिमणाजी यांस देवाज्ञा झाली. " ६ त्रिपुटीच्या डोंगरावर. ७ देवासारिखी.