पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, भक्तिभावानें अपेक्षा करूं लागले. छत्रपति शाहु महाराज व त्यांचे पट्ट प्रधान बाजीराव पेशवे हे स्वामींच्या अर्ध्या वचनांत वागून त्यांच्या सदुपदेशानें चालू लागले. त्यामुळे त्यांस मोठमोठ्या राज्यकारणांत यश प्राप्त होऊन मराठी राज्याचा अभ्युदय होऊं लागला. त्या योगानें त्यांची स्वामींच्या ठायीं अधिक अधिक निष्ठा जडत चालली, व त्यांस स्वामींच्या आशीर्वादाचा महिमा फार वाई लागला. स्वपराक्रमानें आपला भाग्योदय करूं इच्छिणारा प्रत्येक मराठा वीर स्वामींच्या चरणीं आपलें मस्तक ठेवून, त्यांचा आशीर्वाद व प्रसाद घेतल्यावांचून एक पाऊलही पुढे टाकिनासा झाला तात्पर्य, सर्व राजकारणांच्या यशः सि- द्धीचे द्वार हे स्वामी महाराज आहेत, अशी त्या वेळच्या सर्व महाराष्ट्रमंडळाची पूर्ण खात्री होऊन, जो तो स्वामींच्या चरणाकडे मोठ्या भक्तीनें धांव घेऊं लागला. ह्यावरून स्वामींच्या टिकाणीं सर्व महाराष्ट्रमंडळाचें चित्त हरण करण्यासारखे कांहीं अलौकिक सद्गुण व लोकोत्तर कर्तृत्वशक्ति हीं असली पाहिजेत हें आपोआपच सिद्ध होते. तात्पर्य, धावडशीस आल्यानंतर स्वामींची कीर्ति सर्व महाराष्ट्रांत पसरून सर्व लोकांस स्वामींचा वेध लागला. श्री समर्थांनी हाटलं आहेः— , - कार्यकर्ता कीर्तिवंत । त्यास जाणती समस्त ॥ कार्यकर्ता तो झांकेना। वेध लावी विश्वजना ॥ व असो. स्वामींचा महिमा येणेप्रमाणे पसरत चालल्यानंतर त्यांच्या भेटीस राजश्री छत्रपति शाहु महाराजांपासून तो लहानशा शिलेदारापर्यंत सर्व मंडळी येऊं लागली. भेटीसमयीं प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्याचा आदर करून त्यास मेजवानी व पोषाख देण्याचा क्रम स्वामींनीं ठेविला होता. स्वामींविषयीं सर्व मराठे सरदारांची निस्सीम भक्ति असल्यामुळे त्यांच्याकडून होणारा गौरव त्यांस अत्यंत भूषणावह वाटत असे. स्वामींचा खजिना व चीजवस्त सर्व रसाळगड येथे सभाजी शिंदे नामजाद ह्यांच्या जवळ होती, हे मागें सांगितलेच आहे. ती स्वामी अशा भेटीच्या प्रसंगी तिकडून आणवीत असत. संभाजी शिंदे ह्यांची बरीच पत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यांत स्वामींचे सेवक कमळोजी वाघमारे ह्याजबरोबर, जरी सफेत फुलांचे जांदणी दुपेटे व साधे शेले, गोविंद केशव ह्याजबरोबर ८६ सनगे, व केदारजी डोंगरराव ह्याजबरोबर मेजवानीकरितां रुप्याची भांडी पाठविल्याचे वारंवार उल्लेख सांपडतात. त्याचप्रमाणे चंदन, , , ,