पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ जातां मागंजुनाच्या पासीं धांवोनि शामलारीचा ॥ लोकें निज बाहुबळें केला अपहार शत्रुच्या करिचा ॥ २३ ॥ नेला जयदुर्गावर येउनि तेथील फार लोकांनीं ॥ असुगत दोन पदाती केले भक्षावयासि काकांनीं ॥ २४ ॥ कळतां सिद्दी सातें भार्गवरामस्थ सर्व जन लुटिलें ॥ नेलें देवनगांही तरि या दुष्टासि पाहिजे कुटिलें ॥ २५ ॥ चिमणाजीसह यतिचे सेवक बहु ताडुनी ह्मणे सांगा || कोठें असेल वसु मग पाहे खाणून दुष्ट फॅरसां गा ॥ २६ ॥ इकडे स्नानादि विधि स्वामी येतांच सारुनी श्रवणीं ॥ पढतां कुवृत्त ह्मणती केली कोणीं हि पापसांठवणी ।। २७ ।। दे गज दुर्गपतिप्रति कथिलें, परि तो न दे, पुढे ह्मणुनी ॥ सरखेलाचें पत्रक स्वामींनीं त्या दिलें असे अणुनी ॥ २८ ॥ घेउनि गज निजसंग आले सक्रोध शामलापासीं ॥ बघतां गज, कर जोडी दीनावरि करिं ह्मणे न कोपासी ॥ २९ ॥ सिही सातापासुनि नेली जी वस्तु सर्व पाठविली ॥ भार्गवरामानिकटीं सोडुनि यतिदासभक्ति सांठविली ॥ ३० ॥ निजपतिकडेहि धाडी सर्वांची पावती तसें पदक अर्पुनि यतीस तो विभु रडुनि ह्मणे मी न सोडिं तव पदक ॥३१॥ त्रासुनि निजगणसह ते आले तेथूनि राम वंदाया ॥ आश्रम रक्षाया कीं भक्ताचें कालचक्र भेदाया ॥ ३२ ॥ पाठविली सर्व पुढे वस्तू धावडशितें वसायासी ॥ स्कंधीं वाहुनि अर्ध क्रोश जगन्नाथ धाडि सायासीं ॥ ३३ ॥ १ मागजुनाच्या = माखजन हा गांव कोंकणात आहे. हा या वेळीं आंग्रे यांच्या तांब्यात होता. परंतु तत्पूर्वी हा हवश्यांच्या ताब्यांत असावा असे वाटते. जंजिरेकरांनी दिलेल्या या गांवाच्या कुळकर्णाच्या सनदा श्रीमंत खांडेकर साहेब ( इतिहासप्रसिद्ध गणेश संभाजी व गोपाळ संभाजी यांचे वंशज) जहागिरदार पंथ पिंपळोदा ( माळवा ) यांचे जवळ आहेत. २ हबशांचे शत्रू-आंग्रे. ३ देवाचे ढागिने. ४ सिद्दी सातः - हवशी अंजनवेलीचा सुभेदार. ५ फरसबंदी जमीन. -