पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ भार्गवरामासंन्निध नूतन हे, चार अन्य गांवांत ॥ · रचिलें असंख्य, तत्पद नमितों व्हायास, मान्य देवांत ॥ ११ ॥ यावरि दिल्लीपतिच्या आज्ञे श्रीशाहुराज किल सदल ॥ आले चंदनदुर्गाजवळी वाहुनि शिवास बिल्वदल ॥ १२ ॥ कटिसूत्र स्वीय, तसी कौपिन, यति धाडितीहि राजास ॥ लाभो यश निधि वांछिति त्यातें, ह्मणती जनीं हिरा ज्यास ॥ १३ ॥ ब्रह्मद्राशिष येतां आलें यश शाहुलाच तत्काळीं ॥ स्वामीचरणीं निष्ठा ठेउनि करि शत्रुचीं मुखें काळीं ॥ १४ ॥ , " वीर, प्राज्ञ, घृणावान्, बाळाजी विश्वनाथ पाहूनी ॥ दिधलीं प्रधानवस्त्रे दिव्य मुहूर्तावरीच शाहूंनीं ॥ १५ ॥ आणी त्या ब्रह्मद्रा निज राष्ट्राच्या शिवार्थ भूपाल ॥ सत्कारुनि गुरुसि ह्मणे स्वामी काळासही न कोपाल ॥ १६ ॥ विगतोश स्वामि परी, नृप दे सनदा बळें त्रिगांवांच्या ॥ वैराज-प्रांतींच्या राष्ट्रीं भद्रार्थ सत्य सर्वांच्या ॥ १७ ॥ पूर्वाशिप मनिं धरुनी बाळाजी एक गांव देच तसा ॥ नृपपत्रासह यतिसी, गेला समजुनि कुताप ममहि तसा ॥ १८ ॥ स्वामी निजाश्रमातें आल्यावरि शामल प्रभूहि करी ॥ विनती, आणावा परराष्ट्रांतुनि आमुचा तुझींच कॅरी ॥ १९ ॥ जातों परदेशीं तरि रक्षुनि तुमच्या गजास आणीन ॥ न धरीं भीति मनीं जो पीडिल तद्राष्ट्र सर्व खाणीन ॥ २० ॥ सुखकर वचनें तोपुनि दश संग लोक दे पदातीचे ॥ परदेशांतिल यति तो साधुनि निजकार्य साधि दंतीचें ॥ २१ ॥ मार्गी एक नदीवरि स्नानादिक कर्म धर्म साधाया ॥ उतरुनि गजा पुढे ते धाडिति अरिताप त्या न बाधाया ॥ २२ ॥ १ ताराबाईला यश न येतां. २ निरीच्छ, ३ वांईप्रांतांतील. ४ आपली निकृष्ट दशा संपली असे जाणून. ५ हत्ती. ६ खाणीन= नाश करीन.