पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० अध्याय तिसरा. आर्या. देवा गणपति राया माझ्या पासूनि घ्यावि बा सेवा ॥ आहें शरण तुला मी दीनाचा तूं नको करूं हेवा ॥ १ ॥ चुकलें पारावारी बहु काळ जहाज एक यवनीचें ॥ केला नवस तिणें जी दवडा, घ्या व्यंश, दुःख हानीचें ॥ २ ॥ सांपडलें स्वामिकृपें, आली मग घेउनी स्वनवसवसूं ॥ अर्पी ब्रह्मद्रातें, दवडुनि मल राहिलीहि दिवस वसू ॥ ३ ॥ ब्रह्म त्या वसुचा करुनी व्यय रम्य बाणगंगा ती ॥ शोभविली पापाणे, पातकहा, जीस सर्व सुर गाती ॥ ४ ॥ भार्गवष्टष्टिस आहे वोढा जो ख्यात नंदिनामानें ॥ गुंफा बांधुनि तेथे गाती गणराज बसुनि नेमानें ॥ ५ ॥ चिणुनि द्वारे दोनी पंचममासीं वरी समाधीस ॥ शुद्ध प्रथमदिनीं ते, उपमा दे कवण त्याचिया धीस ॥ ६ ॥ भाद्र चतुर्थी दिवशीं येती बाहेर ते प्रती वर्षी ॥ ध्यानिं विनायक त्यांच्या, भासति सर्वो वशिष्ठ ब्रह्म ॥ ७ ॥ शामल सरखेलाच केलें निर्देर त्या स्थलीं यांनीं ॥ दोघां हितोपदेशुनि, येती देवास ते स्वपायांनीं ॥ ८ ॥ नंतर महोत्सवातें करिती बसविति गणेश यानातें ॥ कीर्तन रसान्न भोजन देती विप्रा त्यजूनि मानातें ॥ ९ ॥ सुरवर विनायकाचा पवनसुताचा सुभार्गवाचाही ॥ मातापुरवासिनिचा रचुनि प्रासाद, घे सुवाचाही ॥ १० ॥ १ स्व-नवस वसू आपल्या नवसाचें द्रव्य, २ बंद करून. ३ पांचव्या महिन्यांत ह्मणजे श्रावण मासांत ४ हबशी ५ आंग्रे. ६ मारुतीचा. ७ परशुरामाचा ८ देवीचा ९ आशीर्वाद.