पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सहघृण होउनि विप्रा दिधलीं जाणूनि लागली भूक ॥ क्षुधिता तृप्त करावें सांगति हा उचित धर्म शंभू के ॥ ३२ ॥ येतां दुर्गायतनीं फलयुग्मा दे ह्मणे समर्पाया ॥ विभुसी, वदे तदा तो विप्रें तीं भक्षिलीं नमुनि पायां ॥ ३३ ॥ सामर्षे यति ह्मणती दुष्टा तूं भंगिली ममाज्ञा ही ॥ ३५॥ जा जा राहुं नको रे गुरुची केलीस तूं अवज्ञा ही ॥ ३४ ॥ मानीं सुख तद्वचनीं त्याचा मनिं रोष हा कदा न वसे ॥ अधिकचि सेवा करि तो वदुनि असा पति मिळे न कीं नवसें ॥ चुरितां पाय यतीचे लत्ताप्रहरेंचि ताडिलें त्यास ॥ वारंवारहि परि तो नाठवि, नच सोडिही यतिपित्यांस ॥ ३६ ॥ ठरतां अल्प निशा मग निजलेसे पाहुनी चुरी चरण | जागृत होतां ह्मणती येथें कां तूं, अनन्य मी शरण ॥ ३७ ॥ करुणावचन श्रवणीं पडतां ठेवी स्वपंचशाख शिरीं ॥ राहें जनीं सुखी बा, तोडिन तव बंध, सत्य सुकृत-शरीं ॥ ३८ ॥ तेथुनि सचूर्ण सगणचि आले स्वकृतोक्त कार्य हेराया ॥ बोलति नमुनि गणेशा देवा त्वद्दास मी असे राया ॥ ३९ ॥ फडणीशी दिधली तैं बापूसी स्वामिंनीं दया करुनी ॥ केले चिमणाजीच्या स्वाधिन भांडारकोश हो भरुनी ॥ ४० ॥ सांगे बापूसी यति लिहिणें न सेरे तवैकहस्तास ॥ न कल्याणाहुनि आणुनि केलें चिटणीस धुंडिपंतांस ॥ ४१ ।। ब्रह्मद्राचें ऐसे बालात्मज भालचंद्र यश गाय ॥ द्वितियाध्यायीं रक्षिल ह्मणुनी वत्सा जसी सुखें गाय ॥ ४२ ॥ इति श्री ब्रह्मद्रचरित्रे भालचंद्र अयाचितकृते द्वितीयोध्यायः समाप्तः. १ सदय २ शंकर. ३ ब्रह्मदेव. ४ रागानें. ५ नवसानें. ६ यति हाच पिता, त्याला. ७ चुना घेऊन. ८ पहावयास ९ संपत नाहीं. १० धोंडोपंतास.