पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यासि ह्मणे यति विभुजी, निज संस्थानास एक कारकुन ॥ थुष्मद्गृहिंचा द्यावा; न्यो वदती ते तदुक्ति आयकुन ॥ १९ ॥ होते बहु तत्सदनीं त्यांतुनि बहु कुशल योग्य हरिभजनीं ॥ निवडिति बापूजीतें, सुज्ञ परीक्षा वसेच साधुजनीं ॥ २० ॥ व्यसनीं सांपडलासा जाणुनि केलाच मुक्त न्यायास ॥ बद्धा मोचन व्हावें करिती मुनि सर्व याच न्यायास ॥ २१ ॥ निजपर शिवार्थ घेउनि त्यास परिव्राजियें निजस्थानीं ॥ बापूची रति यतिसी वत्स-रती जेविं धेनुच्या थानीं ॥ २२ ॥ करिती स्वामिकृपे मग बापूजीपंत सर्वही काजें ॥ द्वेषा गुर्जर करि, तंव फाडी कागद, न उक्त लोकां जें ॥ २३ ॥ पुसती द्रव्यव्यय यति केला वद सर्व केविं बापूस ॥ कागद हानिमुळे तो चुकला, मग फार बोलले त्यास ॥ २४ ॥ अन्य जर्ने कथिलें मग नाहीं अपराध याकडे कांहीं ॥ गुर्जर सर्व करी हें चित्तीं याची नसो विशंका ही ॥ २५ ॥ काढुनि गुर्जर केलें बापूच्या सर्व काज आधीन ॥ स्वामींच्या आज्ञेविण बापू करि कार्य कांहिं आंधी न ॥ २६ ॥ सेवा करिती प्रेमें चिमणाजीपंत परशुरामाची ॥ करिती रुग्हरणार्थ प्रीति जडो, ह्मणुनि तत्र रामाची ॥ २७ ॥ सत्वगुणी चतुर तसे बापूचे आप्त जाणुनी स्वामी ॥ ठेविति संनिध, तंव तो बोले मानीन या पदां स्वा मी ॥ २८ ॥ संगें चिमणाजी ते जाति द्विज दोन आणि घेऊन ॥ महिपतिगडा अणाया चूर्ण, मनीं जळति ज्या अघें ऊन ॥ २९ ॥ दिधलीं होतीं यतिंनीं चिमणाजी-निकट सत्फले दोन ॥ अर्पाया दुर्गेद्रा, रक्षी तो तत्पदासि वंदोन ॥ ३० ॥ क्षुधित द्विज ते ह्मणती आह्मां दे नारिकेल भक्षाया ।। गुर्वाज्ञाभंग रुचे मच्चित्ता नचि, दिलींत रक्षाया ॥ ३१ ॥ १ न्या असे ह्मणाला. २ नेण्याकरितां. ३ पूर्वी ४ रोगहरणार्थ. ५ शांत ६ आपले ७ आणखी ८ तीक्ष्ण (ऊन) पापे (अर्धे).