पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीगणराजें दिधलें स्वालयरचना करावयास धन ॥ यति हे कार्यारंभा करितां आणीक देति वसु सधन ॥ ७ ॥ मेळविले व जें तें, गुर्जर उधयास ठेउनी निकट | गेले विशाळदुर्गा आलयसिद्ध्यर्थ ते नमुनि विकट ॥ ८ ॥ शिरतां परि खातरि ते पुसती तेथील यास हो यवन ॥ 'कथिं वृत्त,' सांगती ते, देति न जावूं त्यजूनियां भवन ॥ ९ ॥ निशिमाजीं दुगैंद्रा स्वप्नीं सांगे गणेश या सोडी ॥ जोडी यश, रिपु तोडी, भवहिम दवडील भक्ति-पासोडी ॥ १० ॥ ब्राह्मीं उठोनि तोपुनि सत्कारुनि तो ह्मणे दया करिं गा ॥ पत्रक देउनि सांगे भिक्षा मम राष्ट्रिची सदा वरिं गा ।। ११ ।। तो ये निजगणसह मग मिळवुनि यति कीर्ति भार्गवाजवळी ॥ रक्षुनि धर्म स्वीयचि, चित्तीं हेरंबराजपद कवळी ॥ १२ ॥ ह्मणती 'भार्गवराम' स्थिरल्यापासूनि भार्गवा निकटी ॥ इंद्रियजित, कधिं ज्यांची पड्पुिंनीं भ्रंशिली नसेचि कुंटी ॥ १३ ॥ इकडे याकुदखानें पाठविले दूत सांगुनी जागा ॥ आणा त्यासि नमूं, जे कथिती जनिं धीपपादकं जा गा ॥ १४ ॥ दूतोक्तं यतिहि निघे गणसह जंजीर दुर्ग देखाया ।। जलधितटीं नियत रमे निज लीलें शक्ति थोर देखाया ॥ १५ ॥ पाहे दुर्गशिराहुनि आणुनि उतरोनि सर्व नौकेत ।। रंभाच्छादन यतिसी धाडित राया करोनि संकेत ।। १६ ।। बैसुनि त्याच दळावरि तरले रत्नाकरांत ते साधू ॥ निरखुनि चित्रा लीला, बंदु ह्मणे या, स्वकार्य मग साधूं ॥ १७ ॥ , पूजियले सत्कारें अंतीं मज तारिती ह्मणोनीच ॥ ग्रामयासि देउनि रक्ष ह्मणे मी कृतांगसा नीच ।। १८ ।। १ उधाजी गुजर. ३ घेत जा. ४ देह. पान, ७ अपराधी. २ संसाररूपी थंडी भक्तिरूपी पासोडी दवडील. ५ गणेशस्मरण करा असें. ६ रंभाच्छादन= केळीचें