पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रात्रौ यापरि करितां कृत्यें हीं घोर एक मनुजाच्या ॥ पडले दृष्टिस भुलला देखुनि लीलाहि योगिराजाच्या ॥ ४४ ।। तेणें गांवांमाजी कौतुक सर्वां जनांस साधूचें ॥ कथिलें, मग ते ह्मणती अंशचि कीं हे पंडास्यबंधूचे ॥ ४५ ॥ अनुभव घ्याया निघती अवजी बल्लाळ, विश्वनाथज ही ॥ गुप्तत्वें तत्सुकृता वानिति कीर्ती विलोकुनी अजही ॥ ४६ ॥ वर्णी चरित स्वमतें एवं हें भालचंद्र कविदास ॥ अध्याय पुरा करि मग वंदुनि गुरुच्या पदारविंदास ।। ४७ ।। इति श्री ब्रह्मद्रचरिते भालचंद्रकृते प्रथमोध्यायः समाप्तः ।। १ ।। अध्याय दुसरा. आर्या. सिद्धिविनायक वदनीं ज्याच्या हें नाम तो जनीं तरला ॥ मृत्यूजन्म महापट त्याचा गणपें स्वयंच कांतरला ॥ १ ॥ वसती तत्र पुढे हे होता तो यत्र रेणुकातनय ॥ देति न पीडा कोणा स्थिरती करुनी जनीं सदा विनय ॥ २ ॥ वंदाया जन येती तेथेही स्वामिशीं, तरायास ॥ आपण दुस्तर भवनिधि, दुष्टकुधीवास कातरायास ॥ ३ ॥ केला विनायकाचा यतिनें सुध्वज तसाच कर्णाही ॥ गातां सद्यश ज्याचें लागे पीयूँपतुल्य कर्णाही ॥ ४ ॥ चालविली गणपतिची पूजनसेवा करीत पूर्वजसी ॥ तद्योगें बहु फांके कांति ब्राह्मीं प्रभाहि पूर्व जसी ॥ ५ ॥ जीर्णालय रामाचें जाणुनि बांधावया महालय तें ॥ भिक्षाटणासि करिती ज्यांचं श्रीपतिपदीं सदा लय ते ।। ६ ।। १ गणपति. २ बाळाजी विश्वनाथ ३ दुष्ट अशी जी कुबुद्धि तेंच कोणी त्र. ४ बाचविशेष. ५ अमृतसम ६ उष:कालीं. ७ सदा लक्ष.