पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दैववश त्या गोपा दर्शन घडतां, शिरासि तच्चरणीं ॥ ठेवी, धन्य ह्मणे मी या चरणां देखिलें सदाचरणी ॥ ३१ ॥ द्यावीं फलमूलादि स्वामींसी नित्य त्याच गोपानें ॥ न त्यजिती कानन तें, गोमुत्रे वा रहाति जलपानें ॥ ३२ ॥ नवल पुढे; गोपालें हरित फलें आणिली रसालांचीं ॥ पक्कफलीं यति ह्मणती आहे रसिं रति, न फार सालांचीं ॥ ३३ ॥ गर्ता खणुनी तेथें पुरिलीं तृणसह फलें हिं पिकवाया | जो करि जतन जनातें दाउनि सत्पथ भवाब्धि चुकवाया ॥ ३४ ॥ गेल्यावरि दिन कांहीं गोप ह्मणे झालिं पक्क, उकरावीं ॥ भक्षावीं सर्व फलें, मजवरि सदया कृपा बहु करावी ॥ ३५ ॥ खणितां स्वपंचशाखें स्वामींच्या तंव करासि साप डसे ॥ लागे रक्त गळाया, शोभे मग अंग लाल कापडसें ॥ ३६ ॥ ऐसें देखुनि धेनुप गेला भयभीत शीघ्र गांवास ॥ आला अन्यदिनीं तो जित कीं मृत साधु है पहायास ।। ३७ ।। पाहे तंव तों बसले, करिति जपा, गरल बाधलें नाहीं ॥ नवल कथी सर्वजनां येउनि, हा योगि योग्य नमनाही ॥ ३८ ॥ सद्यश कर्णी पडतां बाळाजी विश्वनाथ आणि तसा ॥ तेथिल नृपदास कुँणी, उभयें नमिला सुरीं बृहस्पतिसा ॥ ३९ ॥ जोडुनि कर मग ह्मणती यावें भिक्षेस आमुच्या गेहा ॥ सदयत्वें पूत अहो देह करा एकवार संगें हा ॥ ४० ॥ मानुनि तद्वाक्यातें आले प्रेक्षावयासि तत्सदन ॥ उभयें भिक्षा करितां पावति यति तोष यन्मनीं मदन ॥ ४१ ॥ प्रार्थी तैं साधू येथें वस्ती कराजि अंठ-वीन ॥ प्रगटपणे राहुनि मग ह्मणती संकटिं गणेश अठवीन ॥ ४२ ॥ अद्भुत लीला करिती बसुनी रंभांदलावरी जाती ॥ तरुनी सागर भार्गवरामाची करिति नित्य पूजा ती ॥ ४३ ॥ १ अग्यांची २ आपल्या हातांनीं. ३ भिऊन ४ त्याप्रमाणे. ५ आ बाजी बहाळ का० स० ६ अटविना=निःशंक. ७ केळीचे पान.