पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आदौ अष्टविनायक करुनि मयूरेश्वरादि यात्रा ती ॥ वाराणशीस गेले जाणुनि सर्वा जनांस या त्राती ॥ २० ॥ यापरि करोनि तीर्थे मार्गी आले पुढे प्रयागास ॥ त्रिनदी-संगम जेथें करिती सनकादि विप्र यागास ॥ २१ ॥ सारुनि तेथिल विधि मग आले विश्वेश्वरा नमायास ॥ नम्रपणे ह्मणति तुझ्या सदयत्वा महि पुरे न मायास ॥ २२ ॥ यापरि केशवचरणीं सार्थक करुनि निज मायबापाचें ॥ आले शिवाख्यपुरिसी फिरुनी मदहारि शत्रु पापाचे ॥ २३ ॥ आश्रम चवथा करणें ऐसें चिंतुनि मनींच तो यतिला ॥ बोले, ज्ञानेंद्रा मीं तृष्णेवरि सोडिलेंच तोयतिला ॥ २४ ॥ सद ज्ञानेंद्रे मग दिधला चवथा तयासि आश्रम हा ॥ हंसी दीक्षा वरिली जैशी सन्मति बुधं जनीं श्रमहा ॥ २५ ॥ सांगितले ज्ञानेंद्रे ह्मणतिल 'ब्रह्मेद्र' लोक तुज नाम ॥ कर्म न सोडीं परि तूं, लाविति वैष्णव जसा उभा नाम ॥ २६ ॥ तेथुनि गुर्वाज्ञेनें जाउनि उत्तर दिशेस केदारा ॥ नाना तीर्थे सेवुनि आले यांम्येसि मुक्तिच्या दारा ।। २७ ।। कृष्णातीं वसावें चित्तीं, परि घोर राज्य यवनाचें ॥ जाणुनि अरण्यवासी फिरती, ज्या त्यज्य सर्व यवनांचें ॥ २८ ॥ भ्रमतां एक नगावरि रम्य गुहाही सुवर्णगांवाच्या ॥ संनिध स-जला देखुनि स्थिरले, ज्याची सुवर्णगां वांचा ॥ २९ ॥ धेनू चारित होता बाळा गोपाळ त्या सदा रानीं ॥ भक्षितसे आनंदें दिधलें जें अन्न त्यास दौरांनीं ॥ ३० ॥ १ अष्टविनायक हीं स्थाने पुण्याचे आसपास आहेत. २ गयेस विष्णुपदीं पिंड देऊन. ३ पापरूपी शत्रूचा गर्व हरण करणारे. ४ तिलांजली, उदा० संसारावर तिलांजली सोडिली. ५ संन्याश्याच्या हंस, परमहंस, इ० दीक्षा आहेत. ६ श्रमनाशक. ७ याम्या = दक्षिण दिशा. ८ ज्याला यवनाचें सर्व त्यज्य होतें. ९ सोनगांव. १० उत्तम आहेत वर्ण जीचे अशी. ११ वाणी. १२ स्त्रियांनीं.