पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ वर्षी वर्षी वाहुनि दुर्वीची धीपतीस लाखोली ॥ भक्तिवळें देवकृपें जेणें अविधर्म लोटिला खोली ॥ ९ ॥ श्रावणिंची आद्यतिथी येतां प्रारंभ करिति एकांता ॥ निगम-त्रिदिवस विरचुनि नमुनी रम्या समाधि धीकांता ॥ १० ॥ वदती जीस गणेशा पुण्यचतुर्थी दिनींच बाहेर ॥ येउनि पूजुनि गणपा ह्मणती दीनाकडेस बा हेरं ॥ ११ ॥ पार्थिव गणेश शंभु स्वकरें करुनी तयांसि पूजावें ॥ अर्पुनि दूर्वा शमिपति सुमनें शमि धेनुदुग्ध पाजावें ॥ १२ ॥ एक पदीं तिष्ठावें ब्राह्मीं संकष्टहा चतुर्थीला ॥ इंदू-उदया येतां पूजुनि, तो हेमं घे त्यजी कथिला ॥ १३ ॥ अन्नासि न सेवावें कांहिं मिळाल्या फळासि भक्षावें ॥ प्राशुनि गोमुत्रातं तिक्त गिळावें स्वधर्म रक्षावें ॥ १४ ॥ यापरिस भक्ति केलें घोर तपाचरण वत्सरें चवदा ॥ सांगे गणेश तेव्हां दूतांसी मजसमान हाच वदा ॥ १५ ॥ होउनि सकृप अनंतर देवें दर्शन दिलें स्वदासास ॥ ठेवुनि ह्मणे शिरीं कर होशिल मत मम सुलोकवासास ॥ १६ ॥ पावसि वांछिसि जे जे झालासी पूर्ण योगिराज महा ॥ आतां निग्रहतप हैं न करीं, सोडीच सर्व संभ्रम हा ॥ १७ ॥ एवं प्रवरा देउनि झाला गणराज गुप्त ते समयीं ॥ तोपें गणेशदास केली वृत्ती जनीं निरासमयी ॥ १८ ॥ आलें एके दिवशीं चित्तीं वाराणशीस जायाचें ॥ होतां याम निघाले पादद्वय नमुनि धुंढिरायाचे ॥ १९ ॥ १ अधर्म, पातक. २ निगम = ४, त्रि= ३ =३४. ३ बापा, पहा. ४ गायीचें. ५ पहांटेस. ६ नाशक. ७ सुवर्ण ८ कडू, तुरट ९ आशाया: परमं दुःखं, नैराश्यं परमं सुखं, आणि असक्तः कुरु कर्माणि, संगं त्यक्त्वा सुखी भव. १० प्रहर