पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ त्रासामुळे कोंकण प्रांताचा त्याग करून इकडे आलों, तो येथेंही अनिवार उपद्रव पोहोंचतो. ह्याकरितां आपलें राहणें येथे होत नाहीं. " त्यावर शाहु महाराजांनीं स्वामींचें समाधान करून असे उत्तर पाठविलें कीं, “ यमाजी शिवदेव व भवानी शंकर यांस स्वमुखे रुबरु आज्ञा करणें ते केली. याउपरी त्यांकडून कांहीं उपसर्ग होणार नाहीं. स्वामींनी चित्त स्वस्थ करावें. उदा- सीनता सर्वथा न आणावी. स्वामींपेक्षां दुसरे अधिकोत्तर आहे असें नाहीं. स्वामी देवालयें, वापी, कृप, तटाकें, झाडझाडोरा लावितात, हे कीर्ति अक्षय करीजेती. यापेक्षां उत्तम काय आहे? आह्मांस या गोष्टीचा बहुतसा संतोष आहे" (लेखांक १). ह्याप्रमाणे स्वामींस शाहु महाराजांचें आश्वासन मि ळाल्यानंतर स्वामींनी धावडशी, अनेवाडी व वीरमार्डे ह्या गांवीं देवालयें, विहिरी, तलाव, वगैरे बांधण्यास आणि जागोजाग फुलझाडे व फळझाडे लावण्यास सुरुवात केली. स्वामींस फलपुष्पांचा इतका नाद होता कीं सांगतां सोय नाहीं. किंबहुना, ह्या फलपुष्पांच्या प्रसादानें त्यांनी मराठी साम्राज्याचा भव्य प्रासाद तयार करविला, असें ह्मटले असतां क्वचितच अतिशयोक्ति होईल. स्वामींनी जेथे जे उत्तम फुलझाड किंवा उत्तम फळझाड असेल, तेथून ते हरप्रयत्नाने आणवून, धावडशी येथे सुंदर बगीचा तयार केला. त्यामुळे धावडशी गांवास अतिशय रमणीयत्व प्राप्त होऊन तेथें जाणारास समाधान वाटू लागले. शाहु महाराज, त्यांच्या राण्या व सरदार हे स्वामींच्या दर्श- नासाठीं वारंवार धावडशीस जाऊं लागले. तेथील स्वामींचा पवित्र व स्वच्छ मठ, सुंदर व भव्य तलाव आणि रमणीय व मनोहर पुष्पवाटिका पाहून, को- णासही सकुदर्शनींच संतोष वाटू लागला. नुसत्या परिस्थितींतच सर्व हत्ताप दूर होण्यासारखी जेथें शक्ति, तेथें प्रत्यक्ष स्वामींच्या पुण्यदेहाचे दर्शन व त्यांच्या अमृततुल्य प्रसादवचनांचा लाभ झाल्यानंतर तेथें मनुष्यमात्राच्या चित्तास परमानंद वाटून तें स्वामींच्या चरणकमलीं मिलिंदायमान व्हावे ह्यांत आश्चर्य तें काय ? असो. स्वामी कांहीं दिवस महाराष्ट्रप्रांतीं प्रसिद्ध झाले नाहींत. परंतु हळू हळू त्यांच्या कीर्तीचा प्रसार महाराष्ट्रमंडळांत होऊं लागला; व त्या वेळचे लहान मोठे सरदार स्वामींच्या दर्शनाची, त्यांच्या सदुपदेशाची, व त्यांच्या आशीर्वादाची, मोठ्या