पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे वन्हऱ्हाड देशीं लघुशी नामें प्रसिद्ध दुधवाडी ॥ मनसा हरिला तेथें नानानें विप्र सिद्ध दुध वाडी ॥ २ ॥ तदुदरिं बहु सुकृतानें आला गणपांश लोक ताराया ॥ मीही तद्यश भावें गातों संसारदुःख हाराया ॥ ३ ॥ भिक्षाद्रव्यें केलें तातें त्या सूनुचेंहि उपनयन ॥ दावी सुपथ जनीं तो; अक्षर वृद्धास जेविं उपनयन ॥ ४ ॥ पृथ्वीदेव अनंतर अचिर अकग्रस्त पावला मरण | सुतही उत्तरविधि करि तत्स्वांतहि बहु विनायकस्मरण ॥ ५ ॥ लग्नार्थ ये पुढे तो दुर्घट पटहीन तप करायाला ॥ गणनाथ-राजुरी या श्वशुरगृहीं भक्तितें वरायाला ॥ ६ ॥ मुक्त करी सर्व जनां गणपपुरी राजुरी जिला नांव ॥ तरती जन भव- सिंधुहि करुनी तेथें सुभक्तिची नाव ॥ ७ ॥ ऐसी विमलपुरी ती देखुनि तन्मन रमे विकटचरणीं ॥ दासारिष्ट हराया वाटे जैसा मला तैमा तरणी ॥ ८ ॥ सांगतां येणे कठीण आहे. तथापि, हे १८२७ च्या पूर्वीचें नाहीं; त्याप्रमाणेंच है १८५० च्या नंतरचें नसावें, त्याअर्थी ते ३० स०१८२७ व ३० स० १८५० ह्यांच्या दरम्यान लिहिले असावे असे मानण्यास हरकत नाहीं. हे काव्य भाविकजनांनी वाचण्यालायक अशा मराठी कवितेच्या वर्गात मोडत असल्यामुळे योग्य सुधारणा करून पुरवणीरूपानें येथे जोडिलें आहे. , १ तेथे श्रीब्रह्लद्रस्वामींचा पिता जो विप्र तो, मानसिकच, नानाप्रकारची अन्न व दुग्ध हरीला वाढी, झणजे दारित्र्यामुळे मानसिकोपचारांनीं पूजा करीत असे. २ ब्राह्मण = स्वामींचा पिता. ३ रोगग्रस्त ४ या साहाव्या आर्येचा अर्थ असा की, मुंज झाल्यानंतर लग्न व्हावयाचें, त्याप्रमाणे स्वामींनी तपश्चर्येशीं विवाह करावयाचा-तप करणे हाच आपला निश्चय-असा विचार कायम करून स्वामी गणपतीचें स्थान राजुरी या गांधी, त्यास श्वशुरगृह समजूनच की काय, येते झाले. ५ नौका ६ गणेशचरणीं. ७ अंधकार हरायाला जसा सूर्य तसा.