पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १. श्री ब्रह्मेद्रचरित्रे. अध्याय पहिला. आर्या. गणपति धीपति मंगलमूर्ति विनायक गुणेश यद्वदनीं ॥ स्थिरते नामामृत हे पाहूं न शकेहि काल तत्सदनीं ॥ १ ॥ १ हे आर्यावद्ध चरित्र धावडशी येथील रा. रा. दिनकर महादेव तांबे ह्यांच्या दप्तरांत सांपडले. 'श्री ब्रह्मद्रस्वामींच कवितात्मक चरित्र' यापेक्षां प्रस्तुत 6 कोणतेही महत्त्व नाहीं. काव्येतिहाससंग्रहकारांनीं छापलेल्या श्रीस्वामींच्या बखरीवरून हैं तयार केल्याचे दिसते. यांत दिलेली हकीकत फारच संक्षिप्त व त्रोटक असल्यामुळे, यांतील बरींच स्थळे दुबध झाली आहेत. श्री ब्रह्मेद्र- स्वामींच्या बखरीशीं चांगला परिचय असल्यास हा ग्रंथ अवघड वाटणार नाहीं. टीपा देतांना ज्या स्थळांचा बोध बखरीवरून सहज होऊं शकतो त्या स्थळांचा विचार केला नाहीं. त्या फक्त कठिण शब्दार्थाची फोड करण्याकरितां दिल्या आहेत. पहिल्या प्रकारचा प्रयत्न केला असता तर बहुतेक बखरच उतरून घ्यावी लागली असती! हे काव्य भालचंद्र बाळदीक्षित अयाचित या नांवाच्या गृहस्थानें रचिले आहे असे प्रत्येक अध्यायाच्या शेवटीं असलेल्या उल्लेखावरून दिसतें. हा कोणी तरी धावडशी संस्थानाच्या आश्रितवर्गापैकीं असावा, असें त्याच्या भाषाशैलीवरून आढळून येतें. आह्मांस उपलब्ध झालेली प्रत ३० स० १८२७ च्या पोर्तुगाली कागदावर लिहिलेली आहे. हिचा लेखक कोणी व्यंकटेश नांवाचा होता असा शेवटीं उल्लेख आहे. भालचंद्र हा फार विद्वान् असेल असे वाटत नाहीं. जागोजाग यानें अशुद्ध मराठी व संस्कृत रूपांचे प्रयोग केले असल्याचे दिसून येतें. हें चरित्र नक्की केव्हां लिहिलें गेलें हैं