पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३८ करून हुजूरचे निविस्तें मोहिबास पाठविले आहेत. त्यावरून व ईजानेबाचे तर्फेनें दोद्दीज्यादा दोस्तीचे सक्त हरदु मशारनिल्हे मुजबानीं बोल- ● तील. त्यावरून मालूम होऊन येईल. मोहिबा नीचे आलियानें सबबतेनें खैर आहे व मोहिबाचे तकियांत दिवाबत्ती लागेल, असें समजोन मोहि- बास दोस्तीचे हक्कानें कलमीं केलें असे. हमतालाचे करमेनें ईजाने- बाचें खांवदाकडून मोहिवाचें अव्वलच्या बमोजीब जियादा चालेल. कोणएक बातेनें जे ईजानेवाची व मोहित्राची जुदाही आहे ऐसे नसे. हेच वजा मोहिनीं दिलांत समजोन मोहिबाची व ईजाने- बाची मुलाजमत अनकरीबच होऊन येई तें केले पाहिजेच" ह्मणून कलमीं केलें तें मालूम जाहलें. किताबत पोहोंचोन खुष जालों. आपले लिहिल्यावरून आपण दिलांतून चालवितील हा भरंवसा दिसोन आला. ऐशास खालीं यावें तर गैर हंगाम आहे व आझीं ज्याची बंदगी करितों त्याचा हुकूम जालियावरी डोईचे वाटेनें येऊन आपले ठिकाणीं राहूं. मालूम जाले पाहिजे. ज्यादा काय लिहिणें ? प्यार मोहबत मेहेरचे बहुततन्हा बहुत फकिरावर धरून चालविले पाहिजे. हे किताबती.