पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुमचें कोण शहाणपण? अशी वर्तणूक करीत न जाणे. वरकड आपण चतुर्थीस येतों ह्मणून लिहिलें बरें. तुझांस फावेल तर येणें नाहींतर पत्र लिहिलीं आहेत तीं पाठवून देणें. जाणीजे. [लेखांक ३७३] श्रीभार्गवराम. -- चिरंजीव सदाशिव व भवानीदास मु० गोंवे यांसी आज्ञा केली ऐ- सीजे:- तुझीं बहुता दिवशीं पत्र पाठविलें ते पावोन लिहिले वर्तमान कळों आले. मराठ्यांच्या उपद्रवाकरितां आपला उदीम चालत नाहीं; येणेजाणें कोणी देत नाहीं; स्वामीनें दोन चार वर्षे परामर्ष केला नाहीं; ह्मणून लिहिलें. तरी तुझी माळ पोवळियाची पाठवितों ह्मणून आमचे पायाची क्रिया केलीत, याजकरितां माणसें मागें पाठविलीं होतीं. त्यास माळ न पाठविली. आमचा तुझांस कंटाळा आला! याजकरितां आझीं तुझां- कडे माणसें पाठविलीं नाहींत. बाळकृष्ण भुतशेटीचा लेक याणें पांच साशे असर्फी आमचे बुडविले, त्याचें आह्मीं काय केलें ? तुझी तिकडे दुरस्थ येथून तुमचा समाचार घ्यावयास अनुकूल पडत नाहीं. सातारा पेट थोर आहे. येथें माल आणि उदीम कराल तर पांचरों पावेतों रुपये भांडवल तुलांस देऊन हरएकविसीं चालवूं. चित्तास येईल तर येणें. यामागे तुझीं शाल आह्मांस चित्तायोग्य पाठविली व वस्त्रे चित्तायोग्य पाठविलींत. पैका तो तुमचा आह्मीं देखलाच नाहीं. तुमचे तुझांस कामास येईल ! ● [ लेखांक ३७४ ] श्री. - चिरंजीव भक्तराज बकाजीस आज्ञा ऐसीजे:- थोरले सरखेल, धाकटे सरखेल कैलासवासी जाले. या मागें कर्ता तूं आहेस. तुझी गोवळ- कोटचे मसलतेस आर्लेत ह्मणून ऐकिलें. तुझीं तो लिहिलें नाहीं. ऐशास मार्गे पुढे पाहून आपणास रक्षून शत्रूवर जाणें. आतां आझी तो तुझांजवळ कांहीं मागत नाहीं. मागें सुवर्णदुर्गा कोण कारभारी