पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३५ व राजाच्या पुण्यानें मेरूस तुझींच हात लाविला. माझें काय १ मी सर्वांचा जागली. मी तुमच्या राज्यांतून जात होतों, कपाळास काठी टे- कून, वैतागोन जात होतों; परंतु राजापुढें विलाज नाहीं. हल्लीं धावडशी आलों. खालून कातडी व वानीवस्त येते त्यास तुमचे जकातदार त गादा करितात. त्यास तारळेकर व मला व तहद राजापूर पर्यंत दस्तक देणें जें, बावाचे सुपारी व ताग जे येईल त्यास तगादा न करणें मना न करणें, त्यास ताकीद करणें जो मेरूचे देऊळ होईल तो एकंदर दस्तक देणें. घास तोंडचा टाकून आधीं दस्तक देणें. न देस तरी तुजला जळाचे आण. [लेखांक ३७१ ] श्री. सहस्रायु चिरंजीव भक्तराजशिरोमणी अण्णा यांसी आज्ञा केली ऐसीजे:—मी वासोटियापासून तुझीं गुरे गाई राखतों आणि तूं टाकशील तर सुखी टाकणें. श्रीचीं वाईटशीं कामें होणें तें जाहलीं. एक मेरुलिंगाचें देऊळ राहिले आहे. जर तुझी शरीर पुष्ट कराल तर तेंही काम होईल. तर मध उत्तम पातळ अगर दाट ऐसा सोमाजी- जवळ देणे. मध संग्रहीं एक घागर दोन घागरी असो, जो असेल तो झाडून पातळ व दाट पाटवून देणें. समाधीस सत्वरीच जाऊं. कळलें पाहिजे हे आज्ञा. [ लेखांक ३७२] श्री. चिरंजीव राधो बल्लाळ मु० शहादाडे शहर बहाणपूर यांसी आज्ञा केली ऐसीजे:– कासीद याजबरोबर पत्रे पाठविलीं तें छ०२० रविला खर आषाढ वद्य सप्तमीस पावोन लिहिलें कळों आलें. दोनशा रुप- यांची हुंडी पाठविली त्यांत लिहिले जे, केशराबाबत साठ घ्यावे वरकड चौकीपैकी पावले, ह्मणून लिहिलें; तरी साठ रुपये केसोबा यांणीं पाठ- विले ते घेतले. अर्शी लोकांचीं मुले आणून आझांकडे पाठवावीं हैं - -