पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३४ तरीं कीर्ति जाली जे, तूं ह्मणजे भार्गवशिष्य मरा मरा झटर्ले तो राम राम झाला. उपदेशक मंत्र जो तो कांहीं कळत नाहीं. मुख्य भाव आहे तोच कळतो. कांहीं तूं चित्तांत विकल्प आमचे माथां घरितोस याजकरितां विपर्यास होऊन येतो. हैं तुझें मन तुज साक्ष देतच असेल. मी बहुतांचा जागली आहे. म्यां जे कांहीं आजिता- गायत परोपकार केला असेल तो जर खराच असेल, तर आमचा परिणाम बराच होईल. तैसेच कृष्णंभटाची देशमुखी तीन पिढ्या चाललीच आहे. हे अवघ्या पृथ्वीस ठावके आहे. आणि कृष्णंभट (व) अंतप्रभू सातारा भांडों लागले; तेव्हां कृष्णंभटाची मनमुभी वतन खरेंच जालें. याचे साक्ष श्रीनिवास यास पुसणे. येथून अंतप्रभू कुलाब्यास गेला, आणि सरखेलास बोलिला जे, गोविंद दामाजी व श्रीपतराव यांस लांच देऊन आपलेंसें केलें. त्यावरून कानोजीनें यांस पत्रे करून दिलीं, जर कानडा खरा असता तर नवीं पत्र करून कशास कानोजी देता? कृष्णंभटास दोन हजार रुपये नागविला आह्नीं केलं हैं सत्यच असिलें तर गोमूत्र घेईन. या राज्यांत राहीन. मग वैकुं- टवास होईल. नाहीं तर या राज्यांत राहणारच नाहीं. आमचा हातचा हत्ती जेव्हां कानोजीनें नेला तेव्हां कानोजीनें आह्मांस पत्र लिहिलें जें, तुझी भेटीस या. कृष्णंभटाची देशमुखी खरीच आहे. त्याची पत्रे करून देतों. तेव्हां आझी गेलों नाहीं. पुढे तो मृत्यु पावला. पुढें याचे लेंकाचे भेटीस गेलियावर कृष्णंभटास वतनाचीं पत्र करून देविलीं, असें असोन आमचें वचन कोणी अमान्य करील? भोंसल्याचे राज्यांत त्याचा भोक्ता श्री आहे. [ लेखांक ३७० ] .. श्री. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सदस्रायु चिरंजीव आण्णास आज्ञा केली ऐसीजे: - तुझ्या पुण्यानें -