पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३३ पैका काय आहे? हे बराबर येतील ? जसें पवाराचें व आणखी कितेक यश दमाजीचे पदरीं घातलीं, तैसें हें यश दमाजीचे पदरीं खासखेली सेनापद श्री घालितो. याचें पत्र एकांती दमाजीस वाचून दाखवून त्यास होय भरून उत्तर पाठवणें झणजे हेंही यश तुझ्या पदरीं सामान्य पडतें ऐसें नाहीं. तुझी कीर्ति दिगंतरीं प्रसवेल दमाजी- वेगळं पत्र दुसऱ्याचे कानीं पाडसील तर तुजला तुझा पिता गोविंदपंत याचें शपत असे. नारोजी पाठविला आहे. याची त्वरेनें रवानगी करणें. अगर माजी नसला तर दोन महिने माणसें दमाजीचे भेटीकरितां राहतील. यांचा समाचार घेत जाणें. [लेखांक ३६८] श्री. ● मननिर्मल गंगाजल भक्तराज यमाजी तुझांस सुभा न्हवता तेव्हां तुझे घरीं राहोन सुखी केलें. गोविंद रामजी याणें आह्मांस श्रमी केलें होतें. त्यामागे तुजला श्रीनें सुभा दिल्हा आणि तूं आमचा ऐसें असोन, तुझ्या सुभ्यांत आमचे गांवचे रुपये घ्यावे ऐसें नव्हतें. रुपये तुझींच घेतले. ते तुझी चित्त घालतेंत तरी रुपया कोण घेणार होता ? याजउपरी आमचे रुपये सवा तीनशे गेले आहेत. ते उगवून घेऊन फिरोन पाठवून देवास आह्मांस संतोषी करणें झणजे श्रीदयेनें तुझी व तुमचा पुत्र चिरंजीव करील. सर्वकाल कल्याण होईल. याज उपरी आह्मांस कष्टी करणें असेल तर सुखरूप करणें. तुझे माता ते आझांस रेणुकेप्रमाणें. आणि देवास आह्मांस कष्टी केलेंस हें उत्तम नाहीं. समयांतरीं कळों येईल. जाणीजे. शिवदेव यांस आज्ञाः- ताकपाणी घेतलें आह्मांस - [ लेखांक ३६९] श्री. यमाजीस आज्ञा. कोणी कान फुंकून उपदेश करितो. तुझें पुढें बरें होणार. यास्तव अंतरसाक्ष तुझे मस्तकीं श्रीनें हात ठेविला. लोकां-