पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३२ माणूस पाठविले होते, त्याचा जाब आला तो सेवेसी विदित जाइलाच असेल. पुढेही जाच येईल तो सेवेसी निवेदन करू. लक्षप्रकारें तो ध्यानावरी येऊन स्वामींच्या पायासी रुजू राहून स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करील आणि आशीर्वाद घेईल ऐसें आहे. ऐसें असोन दुर्बुद्धि न सोडी तरी त्याची फलश्रुत पावेल. राजश्री शिवाजी हरी स्वामींच्या दर्शनास घेऊन यावें ह्मणून दोन तीन रोज येतों. परंतु प्रजन्यामुळे कोसावरून भिजोन माघारें आलों. उदईक अगर परवा त्यास घेऊन सेवेसी येतों. वरकड सर्वस्वें आह्मी स्वामींचे पदरीचे स्थापित आहोत. सर्व वित्त विषय प्राणसुद्धां स्वामींचा आहे. स्वामींच्या चरणाविरहित दुसरें दैवत जाणत नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. स्वामींनीं लिहिलेलीं पत्रे. [ लेखांक ३६७ ] श्री. - सहस्रायु चिरंजीव महादाजी गोविंद यांस आज्ञा केली ऐसीजे:- तुझ्या बापापासून तूं श्रीचे आशीर्वादाचा. श्रीदया तुजवर तुझें देवें बरें केलें असतां, आह्मी तुजजवळ देवालया द्रव्य मागतों याजकरितां तुझे चित्तांत आमचे ठायीं अनिष्ट दिसोन येतें. ऐशास महादोचा, द्रव्यसंचितार्थ मागापासून कोणाजवळ राहिला ? पैका ऐसें ठेवणें ठेवावें होतें. या लोकीं कीर्ति, परलोकींचा ठेवा. हे कीर्तीच प्रसूर्य अक्षय तो राहील. तूं सुज़, जाणताच आहेस. आह्मांसही तुझें बरें व्हावें हेंच श्रीपासीं इच्छितों, . पिलाजी गायकवाड सांगातें काय घेऊन गेला ? तूं दमाजीचे कीर्तिकर तूं एक कीर्ति तुवां ऐसी केली, त्याणेंकडून भुलोबाचे देवालयास रुपये पंचवीस हजार देविले. दमाजीवर दया होऊन पवार हतवीर्य मोडून टाकिले. तुमच्या राज्यांत सावकारांजवळ किती पैके आहेत ? आणि तुझी अष्टप्रधान, तुझांजवळ