पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३१ . ते उडीनें (होडीनें ?) अलिबागेस येऊन बैसले मानाजी आंगरे कुलाबियाहून चालोन जमावानिसीं आले. तेव्हां यांची व त्यांची झटा- पटी जाहली. मानाजी आंगरे यांजकडील मोड जाहला. दहावीस माणूस मानाजी आंगरे यांजकडील ठार जाहले. तेव्हां मानाजी आंगरे कुलाबेयास गेले. कुलाचेयाचे दर्वाजा देऊन आंतच बैसले आहेत. पाण्याची कुमक इंग्रेजानें केली आहे. गलबतावरून रात्रीचें पाणी पो- होंचवितो ह्मणून कुलाबकरासी ठिकाणा आहे. हिराबुरूज व पाली व सागरगड ऐसे संभाजी आंगरे यांहीं आपलीं निशाणें चढविलीं. जुने लोक सरखेलचे होते त्यांहीं निशाणें घेतलीं. यावरी मानाजी आंगरे यांहीं जुने लोक होते ते कुलावेयांतून काढून दुसरे जागीं ठेविले आहेत. नवे लोक मात्र कुलाबेयांत आहेत. ऐसें वर्तमान कुलाचेयाकडील आहे, तें सेवेसी लिहिले आहे. हे विज्ञापना. [लेखांक ३६६] श्री. सेवेसी विज्ञापना ऐसीजे स्वामींचें आशीर्वादपत्र आले त्यावरून बहुत संतोष जाहला. लिहिलें जें, आपण श्रीचे देवळीं बसल्यानें तुझांस काय लाभ ? तुझी सरखेलास आमचेविसीं काय निमित्त लिहून भीड खर्चावी ह्मणून आज्ञा. तरी स्वामींचें त्या स्थळीं राहणें जाहल्यानें सर्व राज्यास कल्याण आहे. या कार्यानिमित्त भीडें ऐसें काय ? प्राणही खर्चावयाचा व विचारें खर्चावा. ऐसें असोन ऐसी गोष्ट त्याणे मान्य केल्याने त्याचेंहि स्वहितच आहे. हे गोष्ट त्याणें न केल्यानें कोप करून घेतल्यानें शेवट थोडक्याच दिसानें लागेल. या मागें ज्यांणीं आपले चरणासीं अंतर केले त्यांचे परिणाम च्यार महिन्यांत ईश्वरें ठिकाणीं लाविला. त्याचप्रमाणे याचेंदी होणार असले तरी तैसीच बुद्धि यास घडोन येईल. वरकड त्यास व राजश्री केसोपंतास आह्मीं बहुत प्रकारें लिहिले आहे. आजीच एक पत्र मुजरद पाठविले आहे. पेशजी