पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ महाराष्ट्रांत येण्याचा मुख्य उद्देश उत्तम प्रकारें दिसून येतो. अर्थात् हबशांच्या त्रासामुळे स्वामींनी कोंकणप्रांत सोडला असे जरी बाह्यात्कारें प्रसिद्ध झालें, तरी स्वामींचा इकडे येण्याचा मुख्य हेतु अत्यंत पवित्र अशा देशकल्याणाचा होता ह्यांत तिळमात्र शंका नाहीं. जगाचा उद्धार हे ज्यांचे मुख्य व्रत, त्यांचा परोप- कारावांचून दुसरा हेतु काय असणार? तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे:- जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टवीति, उपकारें ॥ भाग ३ रा. @4 - महाराष्ट्र-जन-चित्ताकर्षण. केंद्रस्वामी ३० स० १७२८ मध्ये कोंकणांतून महाराष्ट्रप्रांत आल्यानंतर साता-यानजीक धावडशी येथे राहूं लागले. शाहु महाराजांनी त्यांस धा- वडशी, अनेवाडी व वीरमाडें अर्शी तीन गांवें पूर्वी इनाम करून दिली होतीं. त्यांपैकी धावडशी हैं गांव निसर्गतःच शांत व रम्य असे असल्यामुळे तेंच स्वामींनी आपल्या राहण्याचे मुख्य ठिकाण केले. येथे स्वामींनीं एक वाडा, एक भव्य तलाव आणि एक लहान से देवालय बांधिले; व त्यानजीकच फुल- झाडे वगैरे लावण्यास सुरुवात केली. स्वामी धावडशीस आले त्या वेळीं त्यांचा महिमा सर्व जनसमाजास श्रुत झालेला नव्हता. फक्त छत्रपति शाहु महाराज व त्यांच्या राण्या ह्या स्वामींच्या ठिकाणीं दृढभक्ति ठेवून, त्यांच्या चरणीं सदैव लीन असत. स्वामींची योग्यता व महत्त्व सामान्य जनांस न कळल्या- मुळे प्रथम प्रथम स्वामींस बराच उपद्रव झाला. धावडशी, अनेवाडी व वीरमाडे येथे स्वामींनीं अनुक्रमें चिमणाजी कृष्ण, संभाजी नारायण, आणि अंताजी नारायण भागवत हे कारकून गांवच्या व्यवस्थेकरितां ठेविले होते. परंतु त्यांना गांवकरी लोक जुमानीत नसत. एवढेच नव्हे, तर ह्या प्रांताचे सुभेदार बाबाजी शिवदेव, यमाजी शिवदेव व भवानी शंकर हे देखील, स्वामी कोणीतरी गोसावी आहे असे समजून, त्यांच्या गांवास उपद्रव करीत असत. तेव्हां स्वामींनी शाहु महाराजांकडे तक्रार नेली कीं, "हवशाच्या