पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० सिद्दी सात याजकडील २ खासा सिद्दी सात व उंदेरीचा किल्लेदार ५ घाट गांव को (?) आणखी सरदार १३०० माणूस रणास आलें. आह्माकडील ६० घोडीं ठार ७५ जखमी घोडीं ४०० माणूस पाईचे मानाजी आंगरे यांचे माणूस रणास आले ४००, मानाजी आंगरे यास गोळी उरांत आहे. श्री. येणेंप्रमाणें रण जाहलें ह्मणून राऊत आला. त्याची खुशाली आली. मागाहून तवताम आज उद्यां येणार आहे. आले ह्मणजे पाठवितों. सदर्हु बेरीज लिहिली आहे. येणेंप्रमाणे रणास आले. स्वार आले त्यांसी सोनेंयाचे कडे बारा मोहरांचें दिल्हें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ३६५] सेवेसी विनंति कुलाचेयाकडील वर्तमान तरी राजश्री संभाजी आंगरे नव गुराबा व साठ गलबतं ऐसे आरमार घेऊन कुलाचेयाचे बोन्यावरी आला. तेव्हां एक गलबत पुढे कुलाबेयास पाठविलें कीं, तीर्थरूपाचें थडे अल्लिबागेस आहे तेथे दर्शनास येतों. ह्मणून गलबता- वरून सांगोन पाठविले. त्यास मानाजी आंगरे यांहीं उत्तर दिल्हें "या समयीं न येणें. पुढें उदंड दिवस भेट घ्यावयाचे आहेत." ऐसे गलब- तास जाब दिल्हे. यावरी गलबत कुलाबेयास येऊं लागले, तेव्हां मा- नाजी आंगरे यांहीं कुलाबेयावरून तोफांची मारगिरी गलबतावर केली. तेव्हां पांच माणूस ठार झाले. हें वर्तमान संभाजी आंगरे यांस कळतांच