पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२९ विशेष छ ९ जिल्काद पावेतों आपले आशीर्वादेंकरून वर्तमान यथा- स्थित असे विशेष. कसबे चिपळोन येथें ठाणें कारकून पाठविले आहेत व पेशजी शामलास मुलुखाविसीं लिहिणें तें लेहून करार होणें तो जाहला. ऐसियास कसबे मजकूरची वस्ती जाहली पाहिजे. याकरितां कृष्ण शेटीस व निळोपंत पतकी यांसी येथें आणिलें होतें. परंतु स्वामींचे कोणी परशरामीं जाऊन राहिले विना कोणी वतनदार खालते जातात असा अर्थ नाहीं. तरी स्वामींनीं आपणाकडील कोणी कारकून येथे आझांकडे पाठवावया आज्ञा करून पाठवून द्यावें. येथें शामलास कागदपत्र लेहून देऊन रवानगी करूं. अक्षय त्रितीयाही समीप आली आहे. श्रीची ऊर्जा होऊन आली ह्मणजे सर्वोचें तेंच कल्याण आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ३६४ ] श्री. सेवेसी विज्ञापना स्वामीनें आज्ञापत्र पाठविलें तें पावलें. भांडी जाहली खुशालीची. रेवासचें ठाणें सिद्दी सात याणें घेतलीं होतीं तेथें राजश्री चिमाजी आपा व मानाजी आंगरे गेले. त्यांणीं यास मारून पहिलेयानें घातलें, आणि आराबा देऊन रेवासच्या ठाण्यापासून तीन कोस अलीकडे मुलुकांत येऊन मुलूक मारिला. त्याजवर गलबताची वाट यांहीं रामचंद्र हरी जाऊन धरली. त्यावर हबशी यांचे माणूस जाऊन पांच सात घोड़ीं मारिलीं. दहा पांच माणूस मारिले. हें वर्तमान राजश्री आपांस कळले कीं ( हबशी) जोरावर आहे. त्याजव- ( रून आपणच गेले व मानाजी आंगरे ऐसे गेले. मग सिद्दी सात याणें आराबांतील हजार माणसानिसीं मोंगल झुंज देतात ऐसें (झुंज) दिलें. त्याचा तपशील येणेंप्रमाणें:- राजश्री आपांचीं पत्रे राजश्री स्वामींस आली. -