पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२८ कबूल आहे. चवदा पंधरा वर्षे अन्नवस्त्र स्वामी देतात. स्वामींचें देणें संतत संपत जीवनमाफक परिपूर्ण आहे. ज्येष्ठ मास निघतांच मी दर्शनास येणार होतों. त्यास सावजी आला नव्हता सवव राहिलो. आतां अखेर जाहलें. दिवाणचा हिशेब विल्हेस लाविला पाहिजे. श्रीमंत राजश्री पंतप्रधान फौजसइवर्तमान सिरोंजेसमान आले. लष्कर येथें येईल तेव्हां येथें मोकासियाची कांहीं कटकट आहे. त्याकरितां त्यांचें दर्शन घ्यावें लागतें. यानिमित्य राहिलों. पुढे श्रावणमासीं पाऊस हळू असिला तर चतुर्दशीस मी येईन. आणि पाऊस फार असिला तरी येणें न होय. [ लेखांक ३६२] श्री भवानीप्रसन्न. श्रीसकलतीर्थस्वरूप राजश्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें यमाजीनें चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंति. ता० वैशाख शुद्ध पंचमीपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून येथील वर्त- मान यथास्थित असे विशेष. वेदमूर्ति सदाशिवभट अग्निहोत्री यांणीं स्वामींचें आशीर्वादपत्र दिल्हें तें प्रविष्ट होऊन परम समाधान जालें. मौजे अनेवाडी ता० कुडाळ व मौजे धावडशी ता० परळी या दो गांवींचा वसूल दिवाणांत घेतला ह्मणून स्वामींनी लिहिलें. ऐसियास तेथील वसूल राजश्री स्वामींनीं घेतला ते समयीं आह्मी प्रसंगीं नव्हतो. जरी असतों तरी ऐसी गोष्टी होऊन सहसा न येती. याउपरी कांहीं त्या गांवास (उपसर्ग) लागों देत नाहीं वसूल घेतला आहे तोही पुढें प्रसंगानुसार उगवावयाच्या यत्नास सहसा चुकणार नाहीं. हे विज्ञापना. [ लेखांक ३६३ ] ● - श्री. सकल तीर्थस्वरूप राजश्री बावा स्वामींचे सेवेसीः— अपत्यसमान यमाजी शिवदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना -